राष्ट्र निर्माण सोबत धर्म संस्कृतीचे जतन करण्याचं काम व परंपरा कायम ठेवण्याचे मातृशक्ती करत असते त्यासाठी दिल्ली येथे शहीद स्मारक इथे आनंद अमृत उद्यानासाठी देशभरातील मातृ शक्तींच्या योगदानाने मेरा देश मेरा माती या अभियानांतर्गत प्रत्येक क्षेत्रातील माती जमा करून तसेच महाआरती विविध धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मातृशक्तींचा सन्मान भारतीय जनता पार्टी महिला आघाडीने करून समाजाला दिशा दिल्याचे प्रतिपादन सौभाग्यवती सुहासनीताई धोत्रे यांनी केले. भाजपा महिला आघाडी तर्फे विविध महिला मंडळ तसेच देवी मंडळ शारदा मंडळ यांना भेटी देऊन त्यांच्या कार्याची प्रशंसा तसेच गरबा एकत्रीकरण धर्म संस्कृती संवर्धनाचा काम करणाऱ्या मंडळाचा गौरव करण्याचे काम व प्रत्येकाचा देशाचा विकासामध्ये योगदान असावा या दृष्टीने अभियान राबविण्यात येत आहे या अंतर्गत भाजपा प्रदेश उपाध्यक्ष लताताई देशमुख यांनी आज अकोल्यात भेट देऊन विविध मंडळात भेट दिल्या त्यावेळी प्रसंगी त्या बोलत होत्या.
सौ.सुहासिनीताई धोत्रे,सौ.गंगादेविजी शर्मा,सौ.मंजुषा ताई सावरकर,सौ.पुष्पाभाभी खंडेलवाल, सौ.सीमाताई मांगटे पाटील,सौ अर्चनाताई मसने आणि महानगराध्यक्ष जयत मसने, सुनिता अग्रवाल चंदाताई शर्मा अश्विनीताई हातवळणे वैशालीताई शेळके सुमनताई गावंडे गीतांजलीताई शेगोकार, महाराष्ट्र महिला मोर्चा उपाध्यक्ष सौ.लता ताई देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या अकोला महानगरात प्रत्येक मंडळात सेल्फी विथ मेरी माटी मेरा देश हा कार्यक्रम सौ.अर्चनाताई मसने,यांच्या ,छोटी उमरी येथे करण्यात आला होता.
यावेळेस सौ.लता ताई देशमुख,सौ. सुहासिनी ताई धोत्रे,सौ. मंजुषा ताई सावरकर,सौ.अर्चनाताई मसने,सौ.चंदा ताई शर्मा,सौ.सुमनताई गावंडे,सौ.गीतांजली ताई शेगोकार,सौ.सारिका जयस्वाल,सौ.रश्मी अवचार,सौ.रश्मी कायंदे,सौ.सुयेशा मसनेआणि सौ.वर्षा गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शारदीय नवरात्रौत्सव निमित्त मंडळात शारदा मातेची आरती करण्यात आली*.*तसेच 67 जणांना मातीचे महत्व सांगून त्यांच्या हातातील मातीसहित सेल्फी विथ मेरी माटी मेरा देश या अभियानची अकोला महानगरात प्रारंभ करण्यात आला.
सर्व नगरसेविका, पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष तसेच परिसरातील महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.