कारंजा:-
विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २० नोव्हेंबरला राज्यभरात होणार आहेत. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथील विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनात स्विप ची मानवी साखळी तयार केली.
मतदानमतदान प्रक्रियेमध्ये मतदारांचा जागरूकपणे सहभाग वाढावा यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने स्विप हा २००९ मध्ये सूरू केलेला कार्यक्रम आहे.मतदान प्रक्रियेविषयी जागरूकता वाढावी, त्या प्रक्रियेचे ज्ञान प्रत्येक मतदारापर्यंत पोहचावे,मतदान प्रक्रियेत सामान्य मतदाराचा सहभाग वाढावा हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. लोकशाहीला खर्या अर्थाने लोकसहभागात्मक लोकशाही बनविणे हा योजनेचा मूळ उद्देश आहे.२००९ मध्ये झारखंड राज्याच्या निवडणूकीपासून या कार्यक्रमाची सुरूवात झाली. राज्याची सामाजिक-आर्थिक आणि सांस्कृतिक स्थिती लक्षात घेऊन तेथील लोकसंख्याशास्त्रीय प्रवृत्तीचे विश्वेषण करून या योजनेची आधारसूत्रे मांडण्यात आली आहेत. या योजनेच्या कार्यान्वायासाठी वाणिज्यिक संस्था, स्वयंसेवी संस्था, प्रसारमाध्यमे यांचाही सहभाग घेण्यात येत आहे.
जिल्ह्याच्या जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी मतदान टक्केवारी वाढीवर भर दिला आहे. त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे उपविभागीय अधिकारी कैलास देवरे,तहसीलदार कुणाल झाल्टे, तालुका स्वीप तालुका नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने,जिल्हा परिषद विद्यालय कामरगावचे मुख्याध्यापक प्रा.सुरेश राठोड यांचे मार्गदर्शनात पर्यवेक्षक गोपाल खाडे,नीता तोडकर,कैलास वानखडे,
चंद्रशेखर पिसे,दिपाली खोडके,पुष्पा व्यवहारे, प्रमोद सांगळे, रूपाली लोखंडे रूपाली तायडे,धन्नू गारवे, शितल देशमुख,अंकिता किर्दक शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून मानवी साखळी तयार करून घेतली.महिला, युवक मतदार, दिव्यांग, भविष्यातील मतदार, वंचित घटकांतील मतदार आणि नागरी सेवेत असणारे मतदार या सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी केले.नवमतदार आणि अशिक्षित मतदार ह्या दोन घटकांवर लक्ष केंद्रीत करून त्यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढावा यासाठी विद्यार्थी प्रयत्न करणार आहे. मतदान जनजागृतीसाठी विद्यालयांमध्ये पत्रलेखनाचा उपक्रमही शिक्षक तथा पर्यवेक्षक गोपाल खाडे यांनी राबविला.विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना व इतर नातेवाईकांना पत्र लिहून मतदान करण्यासंदर्भात विनंती केली आहे. ही पत्र विद्यार्थ्यांनी आकर्षकपणे रंगविली व त्यावर मतदान जनजागृतीची घोषवाक्य सुद्धा लिहिली.
स्विप म्हणजे नेमकं काय?
हा स्विपचा लॉंग फॉर्म SVEEP:- Systematic Voters Education and Electoral Participation
आपल्या प्रतिक्रिया द्या....