शासन निर्णया प्रमाणे नगर पालिकेच्या उत्पन्नापैकी पाच टक्के निधी दिव्यांगाच्या सहाय्यते करीता, स्थानिक दिव्यांग बांधवाना समसमान असा वितरीत करण्याकरीता, त्यांच्या खात्यात वळता करणे आवश्यक असतांना, अद्यापपर्यंत दिव्यांगांना सन 2021 - 22 या चालू वर्षाचा निधी वळता करण्यात आलेला नाही . या संदर्भात अनेक दिव्यांग बांधव नगर पालिकेच्या वाऱ्या करीत असल्याची वस्तुस्थिती असून, यासंदर्भात एक महिन्यापूर्वी मुख्याधिकारी दादारावजी डोल्हारकर यांची वैदर्भिय नाथ समाज संघटनेचे अध्यक्ष असलेले,पत्रकार एकनाथ पवार, मोहम्मद मुन्निवाले यांचे सह महाराष्ट्र दिव्यांग संस्था कारंजाचे अध्यक्ष तथा पत्रकार संजय कडोळे यांनी प्रत्यक्ष भेट घेतली होती. त्यावेळी मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी सांगीतले होते की, " ज्या ज्या दिव्यांग बांधवानी कोरोनो लसिकरण पूर्ण केल्याचे वैघकीय ऑनलाईन प्रमाणपत्राची झेरॉक्स दिलेली आहे अशा सर्वांना दिव्यांग निधी पाठविण्यात आला आहे " परंतु अद्यापपर्यंत कोणत्याच पात्र लाभार्थ्याला चालू वर्षाचा सन 2022 या वर्षाचा दिव्यांग निधी पाठविण्यात आलेला नाही . या संदर्भात संजय कडोळे यांनी नगर पालिका समाज कल्याण विभाग आणि मिळकत विभागाचे अधिकारी वाडकर यांची समक्ष भेट घेतली असता त्यांनी सांगितले की, आतापर्यंत आम्ही 2020 - 21 चाच राहिलेल्या दिव्यांगाचा निधी पाठविला आहे . चालू वर्षाचा 2022 चा निधी पाठवायचा बाकी असल्याचे मोघम उत्तर त्यांनी दिले . यामुळे स्थानिक दिव्यांग बांधवामध्ये तिव्रपणे नाराजी असून, स्थानिक नगर पालिकेने, 31 मार्च 2022 मार्च समाप्ती पूर्वी चालू वर्षाचा निधी पाठविण्याची मागणी संजय कडोळे यांनी न प कडे लावून धरली आहे .