ब्रह्मपुरी तालुक्यात हिंदू संस्कृतीत गाय बैल मैस पुज्जनीय आहेत. बलिप्रतिपदेला गोमातेची तर पोळा सणाला बैलांची मोठ्या प्रमाणात थाटामाटात पूजा करून शेतकरी हे हिंदू संस्कृतीतील दोन्ही सण मोठ्या आस्तेने साजरे करतात.मात्र यांत्रिक कारणामुळं बैलांची मागणी घटली. व विदेशी दुधाळ गाई पुढ स्वदेशी गाय नकोशी झाल्याने गोमातेच्या तस्करी कत्तल खाण्याकडे होताना दिसत असून हिंदू संस्कृती ला गालबोट लावण्यात येत आहे. ब्रह्मपुरी बाजारात जनावर घेताना दलाल घरी पालन पोषणासाठी नेत असल्याची पशुपालकांना खोटी बतावणी माहिती करतात. नंतर त्या जनावरांची विल्हेवाट रीतसर कसाई खाण्यात लावीत असल्याने पूज्य गाय व बैल नामशेष होण्याचे मार्गावर आहेत. मागील कित्येक दिवसापासून अनेक ठिकाणांवरून नागभीड तालुक्यातील नीलम, मसली गो - तस्करीचा गोरखधंदा राजरोसपणे सुरू असूनही संबंधित विभागीय अधिकाऱ्याच्या दुर्लक्षित पणामुळे हजारो जनावरांची कत्तलखान्याकडे रवानगी होत आहे. मात्र गो -तस्करांवर कुठलीही कारवाई होत नसल्याने त्यांचे मनोबल वाढून जनावराच्या तस्करीने वाऱ्यासारखा वेग घेतला आहे.
सदर गो. तस्करी चा धंदा हा मागील कित्येक वर्षापासून सुरु आहे. तांत्रिक युगात तंत्रज्ञानाने यांत्रिकी शेती करण्यात येत असल्याने व पशु पालनासाठी पशु पालकास चराई व राखाई, परवडत नसल्यामुळे शेतकरी मोडक्या तोडक्या दरात आपली जनावरे दलाला मार्फत अन्य पशुपालकांना विकतात. मात्र ते पशु पालक नसून तस्कर असतात. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, तसेच भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर, मासळ, सानगडी, येथील बाजारातून जनावराची दलालांमार्फत खरेदी करून नंतर आठवड्यातील बुधवार व शनिवारला, रविवार ला दुपारच्या आणि मध्यरात्री जनावरांचे तस्कर आंध्र प्रदेश तसेच नागपुर ला कत्तलखान्यात रवाना करतात.