तालुक्यातील लाडज गाव परिसरातील नागरिक विजेच्या लपंडावाने त्रस्त झाले आहेत. अचानक वीज गेल्याने नागरिक या प्रखर उन्हाळ्यात उन्हाच्या उकाड्याने हैराण झाले आहेत. वेळी अवेळी होणाऱ्या विजेचा लपंडावामुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत कधी होईल याची वाट नागरिक पाहत बसत होते..महावितरणचा भोंगळ कारभराचा फटका नागरिक विनाकारण सहन करावा लागत होता.
सततच्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक मेटाकुटीला आले असून यापासून महावितरण कधी सुटका करणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले. गेल्या काही दिवसांपासून लाडज गाव परिसरातील विजेचा लपंडाव थांबता थांबेना उलट दिवसागणिक विजेच्या लपंडाव होण्याचे प्रमाण वाढतच आहेत.
त्यामूळे परिसरातील नागरिक विजेच्या लपंडावाने हैराण झाले आहेत. एकदा वीज गेली तर ती परत तासनतास येत नसल्याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर, थकुन भागुन येणाऱ्या बळीराजावर किवा इतरावर पडत होता .
परिसरातील नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी वाट पाहणे नित्य नियमाचा खेळ झाला होता. नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नव्हती. तक्रारीची दखल जर एखाद्या वेळेस घेतली तर ती तात्पुरती दुरस्ती केली जायची. त्यामूळे विजेवर चालणारी विद्युत उपकरणे यांना विजेचा कमी दाब तर कधी विज यायची जायची यामुळे विद्युत उपकरणामध्ये बिघाड येवून परिणामी अनेकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. नागरिकांकडून वीज बिलाची रक्कम विद्युत वितरण विभाग तत्परतेने वसूल करते. एखाद्या ग्राहकाने वेळेवर वीज बिलाचा भरणा केला नाही तर तातडीने त्याची वीज जोडणी तोडली जाते. सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून गाववासियानी आंदोलनचा पवित्रा घेत दिनांक:- १९ मे २०२३ ला लाडज ग्रामवासीयांनी आंदोलन चिखलगाव फाटा मुख्यरस्त्यालगत असलेल्या महावितरण उपकेंद्र येथे केले. या आंदोलनामध्ये बहुसंख्य लाडज गावातील नागरिक उपस्थित होते. महावितरण विभागाचा भोंगळ कारभारामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.