वाशिम (संजय कडोळे यांचेकडून) एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यावत येत आहे.
कृषी सहाय्यकामार्फत प्रत्येक गावातील अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचे विशेष मेळावे आयोजित करून योजनेची माहिती देण्यात येणार आहे. मोहिम स्वरूपात कॅम्प घेऊन शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याकरीता व या घटकाचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत संरक्षित शेती, कांदाचाळ उभारणी,शेततळे अस्तरीकरण,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटीका,प्रति थेंब अधिक पीक- सुक्ष्मासिंचन, ठिबक/तुषार संच व एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेअंतर्गत मसाला पिके, (क्षेत्रविस्तार),जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन,सामुहीक शेततळे, शेततळे अस्तरीकरण,शेडनेट हाऊस, पॉलीहाऊस,प्लॅस्टीक मल्चींग, मधुमक्षिका पालन,यांत्रिकीकरण (ट्रॅक्टतर,पॉवर टिलर इतर अवजारे/उपकरणे),पॅक हाऊस,कांदाचाळ या घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे.
योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिसा महाबळे यांनी केले असल्याचे महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी सांगीतले.