वाशिम : वाशिम जिल्ह्यातील धडाडीच्या आदर्श समाजसेविका तथा तरूण क्रांती मंच वाशिमसह,विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी तसेच उत्कृष्ट महिला पत्रकार असलेल्या अॅड.सौ.भारती निलेश सोमाणी यांची महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या,प्रतिष्ठेच्या,पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार करीता निवड करण्यात आलेली आहे. मागील पाच वर्षापासून प्रलंबित असलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराची घोषणा नुकतेच दि.३ मार्च रोजी शासनाकडून करण्यात आलेली असून,राज्यातील तब्बल वैयक्तीक व संस्था मिळून ७८ पुरस्कारार्थ्यांकरीता पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. २०१५ ते वर्ष २०२० या पाच वर्षाच्या पुरस्कारांची घोषणा एकाच वेळी करण्यात आली आहे. महिला व बालविकासाच्या क्षेत्रात चांगले काम करणार्या महिलांना व संस्थांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी व त्यांच्या कामाला राजमान्यता मिळावी या उदात्त हेतुने शासनाच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. मागील पंधरा वर्षापासून अॅड. सौ. भारती सोमाणी, महिला व बालकल्याणाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. आदिवासी बहुल क्षेत्रातही दरवर्षी त्या सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी होतात. सोबतच चेतन सेवांकुर या दिव्यांग बालकांच्या विविध सामाजिक व त्यांच्या मदतीसाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे. दरवर्षी रस्त्यावरील निराधार बालकांना कडाक्याच्या थंडीत उबदार कपडे, स्वेटर्स,ब्लॅकेट वाटपाचे कार्य त्या आपले सामाजिक दायीत्व म्हणून पार पाडीत असतात. स्वस्वार्थाकरीता किंवा प्रपंचा करीता वकिली व्यवसाय न करता सौ भारती सोमाणी निस्पृहपणे महिलांना व बालकांना त्यांच्या हक्काबाबत निशुल्क मार्गदर्शन करीत असतात. लिनेस क्लबच्या वतीने त्यांनी महिलांच्या विविध उपक्रमात योगदान दिले आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन व योगदिनानिमीत्त आयोजित विविध कार्यक्रमात त्यांनी सक्रिय भुमिका व सहभाग नोंदविलेला आहे. शासनाच्या नेहरू युवा केंद्राच्या राष्ट्रीय सेवाकर्मी म्हणून त्यांनी कार्य केलेले असून वाशिम जिल्ह्यात आदर्श समाजसेविका म्हणून त्यांची ओळख आहे . त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत शासनाने २०१७ - २०१८ या वर्षाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कराकरीता त्यांची निवड केली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांच्या निवडीमुळे संपूर्ण जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात आनंदोत्साह व्यक्त केल्या जात असून कारंजा येथील साप्ताहिक करंजमहात्म्य परिवार, विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा, ज्ञानगंगा साहित्य मंडळ कारंजा, महाराष्ट्र गोंधळी समाज संघटना वाशिम, महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषद, आदर्श जय भारत संस्था कारंजा आदी संस्थेच्या वतीने तसेच संजय कडोळे,दिलीपजी गिल्डा, प्रदिप वानखडे, नंदकिशोर कव्हळकर, सौ आशाताई कव्हळकर,डॉ ज्ञानेश्वर गरड, सौ . ज्ञानदेवी गरड,पांडूरंग माने, मा . मुख्याध्यापिका सौ चंदाताई माने, मोहित जोहरापूरकर, डॉ.इम्तियाज लुलानिया, देविदास नांदेकर, ओंकार मलवळकर, उमेश अनासाने, श्याम सवाई, रोहित महाजन, कैलास हांडे, डॉ . मिर्झा, डॉ आशिष सावजी, डॉ . संजय किटे, डॉ मुजफ्फरखान, डॉ स्नेहल राऊळ, शिवाजीराव गायकवाड, लोमेश पाटील चौधरी, सुनिल गुंठेवार, भगवानदास खेमवानी आदींनी त्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या प्रतिक्रिया द्या....