आरमोरी कराटे असोसिएशनचा विद्यार्थी अथर्व योगेन्द्र तिवाडे गडचिरोली जिल्ह्याचा आरमोरी या तालुक्याचा रहिवासी असून याने नेपाळ काठमांडू तेथे झालेल्या एनएसकेए आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून २५ ते ३० या वयोगटात नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आणि इंटरनॅशनल ब्राँझ मेडल मिळवून आपल्या नेत्रदीपक कामगिरीने भारताचे प्रतिनिधित्व करत गडचिरोली जिल्ह्याची मान उंचावली त्यामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .
आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत अथर्व योगेंद्र तिवडे याने आरमोरी कराटे असोसिएशनच्या विद्यार्थीने आरमोरीचा झेंडा थेट आंतरराष्ट्रीय स्वरावर फटकाविला असून कराटे असोसिएशन च्या संचालन सेन्साई नागेश शामराव रामटेके यांच्या कोचिंग मध्ये नियमीत सराव करिता येत होते. सदर कराटे स्पर्धेत ७ देशासह भारताकडून सदर असोसिएशनच्या टीमने भाग घेतले होते. त्यात या टीमने विजेता चे पारितोषिक मिळवले तर अथर्व योगेन्द्र तिवाडे वैयक्तिक नॅशनल गोल्ड मेडलिस्ट इंटरनॅशनल मिळवून आरमोरी च्या क्रीडा क्षेत्राची मान आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचाविली विशेष म्हणजे अथर्व योगेंद्र तिवाडे राहणार वघाळा बर्डी आरमोरी योगेंद्र तिवाडे यांचा मुलगा आहे. सध्या वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर आरमोरी इथे आहे. जिद्द चिकाटी व आत्मविश्वासाच्या बळावर जगात काहीच शक्य नाही हे अथर्व योगेंद्र तीवाडे ने सिद्ध केले.