कारंजा (लाड) : धार्मिक व सांस्कृतिक नगरी असलेल्या,कारंजा शहराच्या शांततेला तोड नाही.मात्र श्री गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद सण साजरा करीत असतांना, आवाजाच्या मर्यादेचे बंधन व नियम पाळून,कारंजेकरांनी शांती व संयम बाळगून कोठेही शिस्तीचा भंग न होऊ देता.कायद्याचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे." असे आवाहन जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अनुज तारे यांनी शांतता समितीच्या बैठकीला उपस्थित असलेल्या श्रीगणेश मंडळांना केले.या संदर्भात अधिक वृत्त असे की,येत्या श्री गणेशोत्सव आणि 'ईद ए मिलाद' च्या पार्श्वभूमीवर, दि २५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ०५:०० वाजता,कारंजा पोलीस विभागाकडून,स्थानिक महेश भवन येथे शांतता समन्वय समिती सदस्य,श्री गणेश मंडळ पदाधिकारी,मौलाना मुस्लीम बांधव आणि पत्रकारांच्या उपस्थितीत शांतता समन्वय समितीची बैठक घेण्यात आली. या महत्वपूर्ण सभेच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा पोलीस अधिक्षक मा.श्री.अनुज तारे,तहसिलदार मा.श्री.कुणाल झाल्टे,भाप्रसे अधिकारी मा.श्री.आकाश वर्मा, मुख्याधिकारी मा.श्री.महेश वाघमोडे, एसडीपिओ मा.श्री.प्रदिप पाडवी उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम उपस्थितांच्या सूचना मागीतल्या जावून त्यांना बोलण्याची संधी दिली असतांना सर्वप्रथम,विदर्भ लोककलावंत संघटना अध्यक्ष संजय कडोळे यांनी आपल्या मनोगतामधून व्यक्त होतांना, श्रीगणेश मंडळांना हवामान अभ्यासक श्री.गोपाल विश्वनाथ गावंडे यांचे पावसाचे अंदाज सांगून १) श्री.गणेश आगमनाचे दिवशी हवामान अंदाजानुसार दि.२७ ऑगष्ट रोजी जिल्ह्याच्या अनेक भागात दुपारी ०४ :०० नंतर व रात्री ०७ : ०० वाजता मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याचे सांगून श्री गणेश मुर्ती शक्य तेवढ्या लवकर आणण्याचे सांगीतले शिवाय ऐनवेळी पाऊस सुरू झाल्यास श्री गणेश मुर्ती व्यवस्थित झाकण्यासाठी सोबत ताडपत्री ठेवण्याची सूचना केली. तसेच २) मिरवणूकी मध्ये डीजेचा दणदणाट टाळून वारकरी संप्रदायाची भजन मंडळे,लोककला,लेझीम पथक,भांगडा आदी कार्यक्रम ठेवण्यात येऊन भारतीय संस्कृती जपण्याचे आवाहन केले. त्यानंतर बोलतांना जामा मस्जिदचे मौलवी अब्दुल माजीद ; नगीना मस्जिदचे मौलवी हाफीज साहब,पत्रकार प्राध्यापक शेख सर यांनी श्रीगणेश उत्सवाला व मंडळाला शुभेच्छा दिल्यात आणि शांती, संयम व जातीय सलोखा जपण्यासाठी आम्ही "ईद ए मिलाद" चा जुलूस दोन दिवस ढकलणार असल्याचे स्पष्ट करून राष्ट्रिय एकात्मता व सर्वधर्मसमभावाचा परिचय दिला.राजाभाऊ चव्हाण यांनी डीजेच्या कर्कश आवाजामुळे वयोवृद्ध,लहानमुले व आजारग्रस्त यांना त्रास होत असल्याची,कर्कश आवाजाने खिडक्यांची काचेची तावदाने फुटत असल्याची आणि विसर्जन मार्गाच्या खड्ड्याची कैफियत मांडून रस्ताच्या समस्येवर तोडगा काढण्याचे सुचवले.श्याम सवाई यांनी आपले अनुभव कथन करून इंझोरी येथील अडाण पात्रावर असलेला पुल पुरातन व शिकस्त असल्याने तेथे जास्त गर्दी करू नये. असे आवाहन केले. त्यानंतर व्यासपिठावरील प्रमुख पाहुणे तहसिलदार कुणाल झाल्टे यांनी, "शासनाने गणेश उत्सवासाठी संपूर्ण राज्यभर स्पर्धा आयोजीत केलेली असून त्यामध्ये दिड कोटी रुपयाची बक्षिस देण्यात येणार असल्याचे सांगून त्यासाठी तालुकास्तरावर समिती नेमण्यात आलेली असून समितीद्वारे श्री गणेश उत्सवाचे परिक्षण होऊन विजेत्या मंडळाची निवड होणार आहे.स्पर्धेसाठी १) पर्यावरण पूरक गणेशोत्सव २) कला व संस्कृतीला वाव देण्यासाठी लोककलेला महत्व ३) गणेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांच्या स्पर्धा व गुणगौरव ४) सामाजिक प्रबोधन भजन,किर्तन, प्रवचन, व्याख्यानाचे आयोजन प ५) सामाजिक व विधायक कार्य म्हणून आरोग्य,रक्तदान,नेत्र चिकीत्सा शिबीर वगैरे आयोजीत करण्यात यावे असे निकष असल्याचे स्पष्ट केले.तर दूसरे प्रमुख पाहुणे कारंजा नगर पालिकेला नुकतेच नियुक्त झालेले मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी नगर पालिकेकडून विसर्जन मार्गातील रस्ते,लाईट, विसर्जनासाठी व निर्माल्य संकलनासाठी यंत्रणा उभी करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यासोबतच त्यांनी ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी आपल्या संभाषणातून मुसळधार पावसाचे अंदाज देवून सतर्क केले.आणि डिजे ऐवजी वारकरी संप्रदाय व लोककलेला प्राधान्य देण्याचे सांगीतल्याचा विशेष उल्लेख केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांनी सांगीतले, "कारंजा शहरातील सर्वधर्मिय जनता शांतीप्रिय असून एकोप्याने राहणारी आणि प्रशासनाला सहकार्य करणारी आहे.त्यामुळे येणारे सण उत्सव आनंदात साजरे होतील असा माझा विश्वास आहे." यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ए पी आय अल्लापूरकर यांनी तर आभार प्रदर्शन ए पि आय लसनते यांनी केले. सभेच्या कार्यक्रमासाठी गोपनिय विभागाचे पोकॉ. मिथुन सोनोने, पो.कॉ.उमेश चचाने यांनी अथक परिश्रम घेतले.
चौकट:-
पोलीस अधिक्षक मा.श्री.अनुज तारे, तहसिलदार मा.श्री.कुणाल झाल्टे, भाप्रसे अधिकारी मा.श्री.आकाश वर्मा, मुख्याधिकारी मा.श्री .महेश वाघमोडे, एसडीपिओ मा.श्री.प्रदिप पाडवी यांचे उपस्थित झालेल्या शांतता समन्वय समितीच्या सभेत विदर्भ लोककलावंत संघटना अध्यक्ष श्री.संजय कडोळे यांनी आपल्या मनोगता मधून व्यक्त होतांना, श्रीगणेश मंडळांना हवामान अभ्यासक श्री. गोपाल गावंडे यांचे पावसाचे अंदाज सांगून १) श्री.गणेश आगमनाचे दिवशी दि. २७ ऑगष्ट रोजी जिल्ह्याच्या अनेक भागात दुपारी ०४ :०० नंतर व रात्री ०७ : ०० वाजता मुसळधार पाऊस होण्याची शक्यता लक्षात घेऊन श्री गणेश मुर्ती झाकण्यासाठी सोबत ताडपत्री ठेवण्याची सूचना केली. तसेच २) मिरवणूकी मध्ये डीजेचा दणदणाट टाळून वारकरी संप्रदायाची भजन मंडळे,लोककला,लेझीम पथक,भांगडा आदी कार्यक्रम ठेवण्यात येऊन भारतीय संस्कृती जपण्याचे आवाहन केले.