कारंजा: (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) जिल्हा पोलिस अधिक्षक बच्चनसिंग तथा उपविभागीय पोलिस अधिकारी जगदिश पांडे यांच्या मार्गदर्शनात कारंजा शहर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरिक्षक आधारसिंह सोनोने,कारंजा ग्रामिणचे पो.नि. गजानन धंदर यांच्या कुशल कामगीरीने पोलिस नाईक उमेश बिबेकर, पो कॉ नितीन पाटील, महिला पो कॉ वंदना इंगोले इ नी बेपत्ता मुलीचा शोध घेऊन उल्लेखनिय कामगीरी पार पाडल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेला मिळालेल्या वृत्तानुसार, अर्जदार राजर्षी प्रमोद महाजन यांच्या दि २२ एप्रिलच्या दाखल तक्रारीनुसार, शांतीनगर कारंजा येथून, एक अल्पवयीन मुलगी दि १९ मे रोजी बेपत्ता झालेली असल्याच्या माहितीवरून शहर पोलीस स्टेशनने मिसिंग क्रं .१३/२३ प्रमाणे गुन्हा दाखल करून तक्रार घेतली व शहर पो स्टे चे ठाणेदार आधारसिह सोनोने यांनी ,पो हे कॉ संदिप,पो ना अजय,पो कॉ मानिष यांचे तपास पथक नेमून सर्वत्र चौकशी आरंभ केली असता आजुबाजूला अमरावती वगैरे ठिकाणी मुलगी आढळून न आल्याने परत तपास सुरू केला असता गोपनिय माहितीच्या आधारे सदर अल्पवयीन मुलगी मध्यप्रदेशा मध्ये असल्याची माहिती मिळाली त्यावरून दुसरे तपास पथक पो. ना. उमेश बिबेकर, पो. कॉ.नितीन पाटील, महिला पो कॉ वंदना इंगोले यांचे नेमून त्यांनी दि ३ मे २०२३ रोजी त्यांना मध्यप्रदेशात पाठवीण्यात आले. तेव्हा छिंदवाडा जिल्ह्यात पो .स्टे. परासीया येथे जाऊन कसोशीने चौकशी केली असता ही मुलगी तिच्या मित्रासह आढळून आली. त्यामुळे सदर्हू बेपत्ता झालेल्या मुलीला कारंजा शहरात आणण्यात येवून तिच्या आई वडिला कडे देण्यात आले आहे. त्यामुळे तिच्या आई वडिल व नातेवाईंकांनी पोलीसाच्या कामगीरीचे आभार मानले आहे . सध्या कारंजा शहर पोलीस इतरही हरवीलेल्या मुलींचा शोध घेत आहे. असे वृत्त शहर पो स्टे कडून घेण्यात येत आहे. असे वृत्त संजय कडोळे यांनी कळवीले आहे.