कारंजा लाड :(संजय कडोळे जिल्हा प्रतिनिधी)राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी शासन आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन आज 14 जून रोजी कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे करण्यात आले.या शिबिरातून विविध योजनांच्या 592 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. अध्यक्षस्थानी कारंजा उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी कैलास देवरे,जिल्हा परिषद सदस्य मीना भोने, पंचायत समिती सदस्य शबाना परवीन मैनुद्दीन सौदागर व विशाल घोडे, तहसीलदार कुणाल झाल्टे,गटविकास अधिकारी शालिग्राम पडघन,नायब तहसीलदार विनोद हरणे,गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने,तालुका आरोग्य अधिकारी डॉ एस.आर.नांदे,वैद्यकीय अधिकारी राम काटोले व सरपंच साहेबराव तुमसरे यांची उपस्थिती होती.

शिबिरात महसूल विभागाअंतर्गत असलेल्या संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ योजना, दुय्यम शिधापत्रिका,विविध दाखले व सलोखा योजना आदी योजना व सेवांचा 139 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. पंचायत समिती अंतर्गत 261 लाभार्थ्यांना रमाई आवास योजना,दिव्यांग मदत वाटप, प्रधानमंत्री आवास योजना, सीआयएफ निधी, बचत गटांना कर्ज वाटप,शिलाई मशीन वाटप, शिक्षण विभागाकडून गुणगौरव प्रमाणपत्र वाटप,एकात्मिक बाल विकास सेवा योजना, रोजगार हमी योजना व अन्य योजनांचा लाभ देण्यात आला.
आरोग्य विभागाकडून 53 लाभार्थ्यांना आभा कार्ड, गोल्डन कार्ड,एनसीडी,जननी सुरक्षा योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. 92 व्यक्तींची आयोजित आरोग्य शिबिरात तपासणी करण्यात आली.कृषी विभागाकडून 43 लाभार्थ्यांना बियाणे परमिट, स्पिंक्लर सेट, कांदा चाळ व रोटावेटरचा लाभ देण्यात आला. महावितरणकडून चार लाभार्थ्यांना घरगुती विद्युत मीटर देण्यात आले.
या शिबिरात महसूल,पंचायत, कृषी,महावितरण,शिक्षण,
पशुसंवर्धन, एकात्मिक बाल व महिला विकास,आरोग्य आणि वन विभागासह अन्य विभागाचे स्टॉल लावले होते. शिबिरातून लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती देण्यात आली.
गटविकास अधिकारी पडघन यांनी आपल्या मनोगतातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. प्रास्ताविकातून श्री.झालटे यांनी शासन आपल्या दारी उपक्रमाची माहिती दिली. संचालन नायब तहसीलदार विकास शिंदे यांनी केले. आभार ग्रामसेवक गजानन उपाध्ये यांनी मानले. शिबिराला कामरगाव महसूल मंडळात येणाऱ्या गावातील सरपंच,उपसरपंच,सदस्य,नागरिक,
विविध योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....