तालुक्यातील आदर्श ग्राम घाटकुळ येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार स्वप्निल बुटले (२७) यांचा अपघाती मृत्यू झाला. बुटले यांचे लग्न जुळले होते. भंडारा जिल्ह्यात दुचाकीने आपल्या नातलगांना भेटण्यासाठी जात असताना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने त्याला चिरडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. गावाच्या विकासात सक्रिय कार्य करणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती.