वाशिम : लोककलावंताच्या न्याय हक्का करीता कार्यरत राहून, शासन दरबारी अथक पाठपुरावा करून, आपल्या मागण्यांची पूर्तता करून घेण्यात 100% यशस्वी ठरलेल्या महाराष्ट्रातील एकमेव अशा "विदर्भ लोककलावंत संघटनेच्या" पाठीशी सदैव राहणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि मनसे अध्यक्ष राजुभाऊ किडसे, उपाध्यक्ष अमोल लुलेकर इत्यादी पदाधिकाऱ्यांचे सहर्ष मनापासून आभार मानण्या करीता,शुक्रवार दि. 17 मे 2024 रोजी वाशिम येथे प्रत्यक्ष भेट घेवून त्यांचे आभार मानले.या संदर्भात अधिक वृत्त असे की, "लोककलावंताच्या गेल्या पाच वर्षातील समस्या सोडविण्यात येवून प्रलंबित वयोवृद्ध कलावंताना मानधन मंजूर करण्यात यावे आणि मानधनाची सरसकट रक्कम पाच हजार रुपये महिना प्रमाणे वाढविण्यात यावी." या व इतर मागण्या करीता दि 24 जानेवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे विदर्भ लोककलावंत संघटनेच्या जिल्हाभरातील लोककलावंतानी विराट असे क्रांतिकारी धरणे आंदोलन केले होते. आणि निर्णायक ठरलेल्या या क्रांतिकारी धरणे आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजुभाऊ किडसे तथा उपाध्यक्ष अमोल लुलेकर यांनी सर्व शाखा पदाधिकाऱ्यांसह भेट देऊन,पाठींबा दर्शवित लोककलावंताच्या मागण्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्याची भेट घेतली होती.शिवाय मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्र्याशी संवादही साधला होता.व शेवटी सर्वांचा पाठींबा मिळाल्यामुळे "शासनाने सरसकट वाढ करून वृद्ध लोककलावंताचे मानधन दरमहा पाच हजार रुपये करण्याचा आदेश पारित करून अंमलबजावणी सुरू केली." त्यामुळे मनसे जिल्हाध्यक्ष राजुभाऊ किडसे यांचे आभार मानण्याकरीता महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त असलेले लोककलावंत तथा विलोसचे अध्यक्ष संजय कडोळे यांचे नेतृत्वात,इंदिरा मात्रे,कांता लोखंडे, सुधाताई डाके, शोभाताई मापारी,प्रदिप वानखडे,धनराज पवार,अजाब ढळे,लोमेश चौधरी यांनी सदिच्छा भेट घेतली.