अकोला : आज दिनांक 26 फेब्रुवारी २०२४ रोजी भारतीय गझलचा चेहरा असणारे सुप्रसिद्ध गायक पंकज उधास यांचे वयाच्या 72 व्या वर्षी आजारपणात मुळे दुःखद निधन झाले . शास्त्रीय संगीताची पार्श्वभूमी असणाऱ्या पंकज उधास यांनी 1980 मध्ये पहिला गझल अल्बम आहट ध्वनिमुद्रित केला . त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही . गझल क्षेत्रात जगजीत सिंग नंतर भारतीय गझल लोकप्रियतेकडे नेण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा होता . चिट्ठी आई है या नाम चित्रपटातून त्यांनी आपल्या गझल गायकीला नवीन आयाम दिला . युवकांमध्ये गझल चे प्रेम व लोकप्रियता वाढवण्यासाठी त्यांनी नज्म या प्रकाराचा साध्या व सरळ संगीतातून प्रयोग केला . ना कजरे की धार अशा चित्रपट गीतातून गझल प्रकाराला नवीन दिशा देत तबला व शास्त्रीय संगीताला ही आपले महान योगदान देणाऱ्या पंकज उधास च्या जग सोडून जाण्याने संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली आहे . आधुनिक गझलचा सूर हरवला . असे मत अकोल्यातील संगीत क्षेत्रातील कलावंत , श्री शिवाजी महाविद्यालय अकोल्याचे सहाय्यक प्राध्यापक व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे यांनी व्यक्त केले आहे .