लातूर दि. शिवसेना-भाजप यांच्या मुख्यमंत्री पदावरून वाद होऊन शिवसेना-भाजप युती तुटली आणि शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या सोबत हात मिळवून महाराष्ट्रात धर्मनिरपेकीचे सरकार स्थापन केले असताना भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातील काही भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेचे नेते आणि विद्यमान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून हिंदुत्ववादी प्रश्न पुढे करून शिवसेनेचे 40 आमदारआमदारा फोडून राज्यात शिवसेनेला मोठे मतदार पाडून आणि महाविकास आघाडी सरकार पाडले त्यानंतर राज्यात शिंदे फडवणीस सरकार स्थापन झाले हे सरकार जास्त दिवस टिकणार नसून हे केव्हाही पडणार आणि पुन्हा एकदा पुरोगामी महाराष्ट्रात धर्मनिरपेकीचे सरकार स्थापन होईल असा विश्वास बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी व्यक्त केला.
बहुजन जनता दल राज्यस्तरीय प्राथमिक सभासद नोंदणी संपर्क मोहीम अंतर्गत बहुजन जनता दल लातूर जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बहुजन जनता दल प्राथमिक सभासद नोंदणी संपर्क मोहिमेचे उद्घाटन बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले तेव्हा ते बोलत होते शिंदे आणि फडणवीस सरकार व जोरदार टीका करून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार केंद्रीय यंत्रणा असलेल्या इतर यंत्रणाच्या माध्यमातून वापर करून विरोधकांना संपण्याचे काम करीत आहे आणि आणि देशात व राज्यात महागाई भ्रष्टाचार बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली असून नागरिकांच्या समस्या कडे या दोन्ही राज्यकर्त्याकडे लक्ष नसून फक्त आणि फक्त फोडाफोडीचे राजकारण करून सत्ता हस्तगत करीत आहे असा आरोपही बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी केला आहे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष परत एकदा यांच्या प्रयत्नाने शिवशाही फुले आंबेडकरांच्या विचारांचे पूरोगामी महाराष्ट्रात धर्मनिरपेक्षतेचे सरकार लवकरच स्थापन होईल असा विश्वास पंडित भाऊ दाभाडे यांनी व्यक्त केला आह यावेळी बहुजन जनता दलाचे लातूर जिल्हा अध्यक्ष श्याम तिकोने रामदास डोरले केशव नेमाडे सुभाष सुरवाडे दीपक पाटील किशोर चौधरी शांताराम नांदगावकर दिपक कांबळे विशाल माने डावखरे सुनीता इंगळे गोकर्ण बाई वानखडे वंदना वानखडे निर्मला डोईफोडे यांच्यासह बहुजन जनता दलाच्या सर्व आघाड्याचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते