"सर्वत्र जी.एन.च्या गरबा नाईटस् ची चर्चा.उद्घाटनाला रिल स्टार अभिनेत्री वर्षा साळुंकीची तर समारोपाला वैभव घुगे यांची उपस्थिती."
*कारंजा (लाड)* : जी.एन.डान्स स्टुडीओ आणि आदिगुंज बहुउद्देशीय संस्था कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने, नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमिवर,महिलांचे विशेष आकर्षण असणाऱ्या "गरबा-नाईटस्" चा समारोप, मंगळवार दि. ०१ ऑक्टोंबर २०२५ रोजी सायंकाळी सात वाजता करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विश्व हिंदू परिषद कारंजाचे अध्यक्ष मंगेश भाऊ कडेल तर प्रमुख पाहुणे रिल स्टॉर वैभव घुगे मुंबई, विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार संजयजी कडोळे,सामाजिक कार्यकर्ते, प्रशिक बँकेचे अध्यक्ष आकाश कऱ्हे, कुणाल महाजन, शशीकांत वेळूकर, युवा पत्रकार संदेश ठाकुर, संतोष पवार, राज प्रचवाणी, आदिगुंज संस्थाध्यक्ष ज्ञानेश्वरजी खंडारे होते. कार्यक्रमाचे आयोजक गगन रॉय सर आणि नम्रता राठोड मॅडम होते. कार्यक्रमाचा शुभारंभ, जगत्जननी श्रीनवदुर्गा मातेच्या पूजन व आरतीने करण्यात आला. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षणामध्ये डान्स इंडिया डान्स, डान्स दिवाने डान्स, बॉलीवूड इंडस्ट्रिचे नृत्य दिग्दर्शक तथा इंडियाचे अव्वल कोरिओग्रॉफर वैभव घुगे मुंबई यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. त्यांच्या उपस्थितीने किडस् गृप,गर्ल्स गृप आणि लेडिज गृपच्या आनंदाला उधाण आले होते.सदर कार्यक्रमात वाशीमचे प्रशिक्षक अक्षय राऊत व गृप आणि विशाल सवले व गृप यांच्या दमदार कामगीरीने उपस्थित प्रमुख पाहुणे मंगेश कडेल, आर्टिस्ट सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे,कुणाल महाजन, आकाश कऱ्हे, ज्ञानेश्वर खंडारे यांनी चांगलीच दाद दिली. तर प्रेक्षकांची वाहवा मिळवीली. कार्यक्रम आयोजक गगन रॉय तथा नम्रता राठोड यांनी "नवदुर्गोत्सवा निमित्त,स्त्री शक्तीला मानाचा मुजरा करण्यासाठी सदर 'गरबा- नाईटस्' चे आयोजन (ओन्ली गर्ल्स ॲन्ड लेडिज) केवळ महिला मंडळी करीता केल्यामुळे त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे." सदर गरबाच्या शुभारंभाचे उद्घाटन सुद्धा शाही थाटात विशेष आकर्षण ठरलेल्या 'डान्स दिवाणे' फेम अभिनेत्री आणि रील स्टार वर्षा साळुंकी,मुंबई यांच्या विशेष उपस्थितीत, सुप्रसिद्ध उद्योजक ललितजी चांडक यांच्या अध्यक्षतेखाली, ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे, नगर पालिका मुख्याधिकारी वाघमोडे यांच्या सौभाग्यवती वाघमोडे मॅडम, प्रा. रघुवंशी सर, भारत राठोड, कारंजा शहरातील प्रतिष्ठित असलेल्या प्रशिक ग्रामिण सहकारी बॅकेंचे अध्यक्ष आकाश कऱ्हे, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत वेळूकर, ज्ञानेश्वरजी खंडारे, धाबेकर महाविद्यालयाचे अधिक्षक राजेशजी अढाऊ,संदेशजी ठाकुर, मंगेशजी कडेल, मनोज रोकडे इत्यादींच्या उपस्थितीत करण्यात आले होते. गेल्या नऊ दिवस आनंदी व उत्साही वातावरणात रात्री उशीरा पर्यंत मुली व महिलांनी गरबा नृत्याचा अविष्कार सादर केला. यामध्ये कारंजा शहरातील जवळ जवळ ४०० ते ५०० महिलांनी सहभाग घेतला.याकरीता गगन रॉय व नम्रता राठोड मॅडम यांनी अथक परिश्रम घेऊन मुली व महिलांचा विश्वास प्राप्त केल्याचे दिसून आले. प्रमुख पाहुण्याचे स्वागत गगन रॉय,नम्रता राठोड व टिम आणि स्वयंसेवी कार्यकर्त्या अर्चनाताई कदम,वर्षाताई लाहे,वंदनाताई खंडारे, रश्मिताई उजैनकर आदींसह महिलांनी केले.एकंदरीत गरबा नाईटसचा कार्यक्रम धाबेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात थाटामाटात पार पडला.पुढे गर्ल्स आणि महिलांच्या आग्रहावरून 'गरबा नाईटस्' कार्यक्रम केवळ महिलांसाठी दरवर्षी आयोजीत करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....