जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक व मॉडल करिअर सेंटर,नाशिक
आणि
दादासाहेब बिडकर आर्ट, सायन्स व कॉमर्स, कॉलेज, पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने
दादासाहेब बिडकर आर्ट, सायन्स व कॉमर्स, कॉलेज, पेठ या ठिकाणी “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा”चे आयोजन करण्यात आले आहे.
सदर रोजगार मेळाव्यात रोजगार देणा-या विविध नामांकित कंपन्या / नियोक्ते दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी 10.00 वा. वरिल दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहुन प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत.
सदर रोजगार मेळावे मध्ये सहभागी होऊन या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्याप पर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगीन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ॲप्लाय करावे.
भरती इच्छुक नियोक्ते यांनी जास्तीत जास्त रिक्तपदे www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर Pandit Dindayal Upadhayay Job Fair ऑप्शनवर Click करुन “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” यावर रिक्तपदे अधिसूचित करावी व दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित रहावे. याबाबत काही अडचणी आल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या 0253-2993321 या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. या मेळाव्याचा जास्तीत जास्त भरती इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन श्री. वि.रा.रिसे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, नाशिक यांनी केले आहे.