कारंजा : संपूर्ण कारंजा शहरात, येत्या सोमवार दि. १३ फेब्रुवारी रोजी,प्रगटदिनाला श्रद्धा, विश्वास, उत्साह व आनंदाचे वातावरण बघायला मिळणार असून, यावेळी शहरातील प्रत्येक कॉलनी, वसाहती मधील श्री गजानन महाराज मंदिर परिसरात पालखी, दिंड्या व मिरवणूका बघायला मिळणार असल्यामुळे श्रीक्षेत्र पंढरपूर श्रीक्षेत्र शेगाव या तिर्थक्षेत्राची अनुभूती बघायला मिळणार असून, संपूर्ण शहरात साफसफाई, जलसिंचन, सडासंमार्जन, रांगोळ्यानी सुशोभित घरा घरांची अंगणे आणि पालखी मार्ग दिसणार असून, दिव्यांचे चिरांगण आणि विद्युत रोषनाईने शहर उजळणार असून पालखी मार्गातिल घरोघरी श्री च्या पालखीचे, दिंड्याचे स्वागत, श्रीच्या पादुकांचे पूजन व हारार्पण, संतमंडळी, विणेकरी व वारकरी मंडळीचे पूजन होणार आहे.श्री भक्तांकडून ठिकठिकाणी पिण्याचे पाणी,अल्पोपहार, फळवाटप,चहापान,अन्नदान महाप्रसादाचे कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेले आहेत. असे वृत्त श्रींचे सेवेकरी संजय कडोळे यांनी कळवीले आहे.