कारंजा : श्री गुरुदेव सेवाश्रम नागपूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या,२० व्या राज्यस्तरिय सामाजिक कार्यकर्ता संमेलनात वाशिम जिल्ह्याच्या कारंजा येथील विविध क्षेत्रातील,अष्टपैलू रत्नांमध्ये चार महिला आणि एकोणाविस सामाजिक कार्यकर्त्यांचा,उपाधी पुरस्काराचे सन्मानचिन्ह,सन्मानपत्र तथा भारतिय संविधान देऊन, संयोजक मदत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रकाश सोनक तथा संस्थापक सचिव दिनेशबाबू वाघमारे यांच्या वतीने जाहीर सन्मान करण्यात आला.कारंजा येथील सच्च्या कार्यकर्त्याचा एवढ्या मोठ्या संख्येत प्रथमच सन्मान झाल्याने कारंजेकरांच्या शिरपेचात सन्मानाचा तुरा खोवल्या गेल्याचे म्हटले जात आहे.याबाबत अधिक वृत्त असे की,केन्द्रशासन तथा राज्यशासन मान्यता प्राप्त, मदत सामाजिक संस्था नागपूरचे अध्यक्ष डॉ.प्रा.प्रकाश सोनक तथा संस्थापक सचिव दिनेशबाबू वाघमारे यांनी राधिकाबाई पांडव चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक गिरीश पांडव यांच्या अध्यक्षतेखाली, प्रमुख अतिथी लॉन्गमार्च प्रणेते विधान परिषदेचे माजी सदस्य जोगेन्द्र कवाडे,विधान परिषद सदस्य आ.ऍड.अभिजित वंजारी, प्रमुख पाहूणे नाळ चित्रपटाच्या अभिनेत्री तक्षशिला वाघधरे, सुप्रसिद्ध उद्योजक इंजि. रूपराज गौरी तथा विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांच्या उपस्थितीत नागपूर येथील श्री गुरुदेव सेवाश्रम सभागृहामध्ये भव्य असे २० वे "सामाजिक कार्यकर्ता संमेलन" घेतले होते.या संमेलनाचा शुभारंभ, संजय कडोळे यांचे हस्ते राष्ट्रसंत गुरुदेव तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व हारार्पण करून करण्यात आला होता.यावेळी नागपूर येथील सेवानिवृत्त न्यायाधिश नरेश बन्सोड,संविधान परिवाराचे प्रा . राहूल मून, माजी नगरसेवक मनोज साबळे, सुभाष भोयर, मनोज , मदत सामाजिक संस्थेचे संचालक प्रा डॉ प्रकाश सोनक, सचिव दिनेश बाबू वाघमारे,सौ रेखताई थूल,नरेश खडसे,अरुण फुलझेले,ईश्वर मेश्राम,जितेन्द्र बोरकर,दामु धनविजय, त्रिशरण पाटील, मुकूंद धनमोगरे यांची विशेष उपस्थिती होती.याप्रसंगी वाशिम जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या सौ सिमाताई सातपुते यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले नारीरत्न पुरस्कार,से.नि. मुख्याध्यापिका सौ चंदाताई माने यांना सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षक रत्न पुररस्कार,माजी नगरसेविका सौ.चंदाताई कोळकर यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार,प्रशिक नागरी सह पत संस्थेच्या सौ.आशाताई राऊत यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार,विजय खंडार यांना संत गाडगेबाबा स्वच्छतादूत पुरस्कार,शिवसेना शहर प्रमुख गणेश बाबरे यांना छ.शिवाजी महाराज आदर्श समाजसेवक पुरस्कार, खेर्डा काळीचे माजी सरपंच प्रदिप वानखडे यांना राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार,रोमिल लाठीया यांना छ शिवाजी महाराज आदर्श समाजसेवक पुरस्कार,ऍड. संदेश जिंतुरकर यांना राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार, श्रीमदभागवतकार हभप अजाब महाराज ढळे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार, अभा नाट्य परिषद नियामक मंडळ सदस्य नंदकिशोर कव्हळकर यांना संत गाडगेबाबा स्वच्छतादूत पुरस्कार, पत्रकार किरण क्षार यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, पत्रकार सुनिल फुलारी यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, गोपिनाथ डेंडूळे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार, सुनिल गुंठेवार यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार,उमेश अनासाने यांना संत गाडगेबाबा स्वच्छतादूत पुरस्कार,दामोदर जोंधळेकर यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार,किशोर धाकतोड यांना राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार, मोहित जोहरापूरकर यांना राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार, उज्वल देशमुख वाशिम यांना राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार,समिर देशपांडे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार,डॉ.इम्तियाज लुलानिया यांना संत गाडगेबाबा स्वच्छतादूत पुरस्कार,रोमिल लाठीया यांना छत्रपती शिवाजी महाराज आदर्श समाजसेवक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मदत सामाजिक संस्था नागपूर कडून, सुमारे वीस वर्षापासून,दरवर्षी सामाजिक कार्यकर्त्याना त्यांच्या समाजसेवेबद्दल कौतुकाची थाप देऊन पुढील समाजसेवेकरीता प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रस्ताव मागवून तसेच सामाजिक कार्यकर्ता संमेलनाकरीता सहभाग शुल्क घेऊन गेल्या दहा वर्षाचे उल्लेखनिय सामाजिक कार्य बघूनच काही नियम,अटी,शर्थी व निकष पूर्ण केल्यानंतरच पुरस्काराकरीता निवड केली जात असल्याचे यावेळी आपल्या प्रास्ताविकामधून संस्थेचे सचिव दिनेशबाबू वाघमारे यांनी सांगीतले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी लॉन्गमार्च नेते प्रा. जोगेन्द्र कवाडे सामाजिक कार्यकर्त्याचा गौरव करतांना म्हणाले की,समाजाच्या हृदयामध्ये नेहमीच आमदार खासदारापेक्षा सामाजिक कार्यकर्त्याचे स्थान सर्वोच्च असून सामाजिक कार्यकर्त्यांमुळेच समाजव्यवस्था व समाजामुळे देशातील बंधुभाव,अखंडता,शांती,सलोखा राष्ट्रिय एकात्मता टिकून रहात असते.त्यामुळे सामाजीक कार्यकर्ता मृत्युनंतरही अजर अमर रहात असतो.
आपल्या प्रतिक्रिया द्या....