वाशिम : वाशिम जिल्ह्याच्या सिमेवरील आणि पंचायत समिती मानोरा मध्ये येणाऱ्या रुई गोस्ता या छोट्याशा खेडेगावात राहणारे, सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे हे त्यांच्या अचूक ठरणाऱ्या हवामान अंदाजामुळे शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनले असून, "शेतकऱ्याचे कैवारी", "बळीराजाचे हितचिंतक" म्हणूनही ओळखले जातात. त्यामुळे गत वर्षीच्या डिसेंबर मध्ये, दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी त्यांची "मदत सामाजिक संस्था नागपूर " यांच्या "छत्रपती शिवाजी महाराज आदर्श समाजसेवक पुरस्कारा" करीता सुद्धा केली होती आणि त्यामुळे त्यांना तत्कालिन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांचे हस्ते राज्यस्तरिय छत्रपती शिवाजी महाराज आदर्श समाजसेवक पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले होते. अशा सेवाव्रती हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांचा नुकताच शेलुबाजार येथील शेतकऱ्यांकडून शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी कारंजा तहसीलचे नायब तहसीलदार अनिल भाऊ वाडेकर,शेलुबाजार येथील तलाठी तुकाराम गावंडे,आदर्श शेतकरी गणेश पाटिल कोरडे, प्रफ्फुल सुर्वे, रुपेश राऊत, गजानन येवले, पत्रकार पवन राठी,अशोक हांडे गुरुजी,किशोर पाटील सुर्वे, तिरुपती कृषि सेवा केंद्राचे संचालक राजेश भांगडीया,मारवाडी युवा मंच अध्यक्ष मनोज अग्रवाल, शेलुबाजार येथील उद्योजक रमेश पवार, यांची उपस्थिती होती.