राजुरा तालुक्यातील धानोरा विरुर मार्गावरून येत असलेल्या दोन हायवामधून अवैध रेती वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून विरुर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दोन हायवा ट्रकांसह ३० लाख २४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी दोन आरोपींना अटक करण्यात आली.
गोंडपिपरी तालुक्यातील आर्वी येथील वर्धा नदीच्या घाटावरून अवैध रेती उपसा करून वाहतूक करीत असल्याच्या माहितीवरून धानोरा विरुर दरम्यानच्या पुलाजवळ ही कारवाई करण्यात आली. यावेळी एमएच ३४ एबी- ९४३० व एमएच ३४ बीझेड- ११६५ या दोन क्रमांकाच्या हायवा ट्रक जप्त करण्यात आल्या. या ट्रकांच्या चालकांकडे कोणताही परवाना किंवा वाहतूक टीपी आढळली नाही. यावेळी वाहनचालक दशरथ बसवंते रा. जिवती व संतोष चिंचोलकर रा. लाठी या दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई विरुर पोलीस ठाण्याचे ठाणेदार निर्मल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नरगेवार, राहुल सहारे, विजय तलांडे, प्रवीण खेर, मिलमले, लक्ष्मीकांत खंडरे, गणेश भोयर, दीपक डोंगर, गोपीनाथ, गणेश मोहुर्ले आदींनी केली.