ब्रम्हपुरी येथील श्री श्रावनजी बगमारे शिक्षण संस्था द्वारा संचालित डॉ पंजाबराव देशमुख कॉन्व्हेन्ट तथा डॉ पंजाबराव देशमुख गर्ल्स ज्यु कॉलेज ब्रम्हपुरी यांचे वतीने संस्थेचे प्रेरणास्थान ,दानशूर स्व श्रावनजी बगमारे यांचा 23वा स्मृती दिन दी 4 डिसेंबर 23 सोमवार ला डॉ पंजाबराव देशमुख कॉन्व्हेन्ट ब्रम्हपुरी येथे आयोजित करण्यात आला आहे.या निमित्त चांदली त ब्रम्हपुरी येथील जी प प्राथ शाळा व डॉ पंजाबराव देशमुख गर्ल्स ज्यू कॉलेज ब्रम्हपुरी येथील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश , प्राविण्य प्राप्त विद्यार्थी यांना रोख पारितोषिक व या निमित्ताने पूर्व विदर्भ येथील ओबीसी व कुणबी समाज पदाधिकारी यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष प्रा प्रकाश बगमारे यांच्या आजीवन संकल्प नुसार आयोजित करण्यात आला आहे.या प्रसंगी ओबीसी व कुणबी समाज पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्था अध्यक्ष प्रा प्रकाश बगमारे यांचे वतीने करण्यात येत आहे