शहरात गेल्या अनेक वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभे व्हावेत या करिता नगर परिषदेद्वारे शहीद चौकात जागा उपलब्ध करून दिली आहे, परंतु अनेक वर्ष लोटूनही आजपावेतो स्मारक उभे राहू शकले नाही ही शोकांतिका आहे, वरोरा नगर पालिकेत अनेक पक्षानी सत्ता भोगली मात्र कोणत्याही सत्ताधाऱ्यांनी शिव स्मारक बनविण्याकरिता पुढाकार घेतला नाही. महाराजांच्या नावाचा फक्त सत्तेसाठी उपयोग करून घेतला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल विनंती केली असल्यास फक्त आश्वासनाची खैरात वाटण्यात आली, निधी आला की महाराजांचे स्मारक उभे करू अशी फक्त ग्वाही देत आले परंतु त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही , अनेक वर्ष जागा उपलब्ध असूनही छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होत नाही हे वास्तव आहे, राजे शिवछत्रपती यांचे स्मारक उभे व्हावे याकरिता मनसेने महाराष्ट्राचे वन, मस्य, सांस्कृतिक तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना वरोरा येथे स्व.अटलबिहारी बाजपेयी अभ्यासिका वाचनालयाच्या उद्घाटनाला आले असता हे निवेदन देण्यात आले, जिल्ह्याचे विकासपुरुष म्हणून ख्याती असलेले पालकमंत्री आम्हास लाभले असुन जिल्ह्यात कोणत्याही विकास कामाकरिता सदैव तत्पर असतात ,आपल्या हातून या जिल्ह्याच्या विकासाकरिता वरोरा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे व्हावे याकरिता सुद्धा आपणाकडून मदत व्हावी . छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाची निव ठेवून ते स्मारक आपल्याच हस्ते उभे व्हावे अशी विनंती मनसे व सर्व वरोरा नागरिक याच्या द्वारे करण्यात आली. तसेच शहीद बापूराव शेडमाके उडानपुराला असलेले नाव प्रवेशद्वारालाही देण्यात यावे , हे निवेदन देताना मनसे पदाधिकारी