कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर काल झाला आहे. यामध्ये काॅंग्रेसच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला असुन कर्नाटक राज्यात काॅंग्रेसने बहुमत मिळविले आहे.
या विजयाने भारावून जात कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाचा जल्लोष म्हणून ब्रम्हपुरी शहरातील शिवाजी महाराज चौकात तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने फटाके फोडण्यात आले. व सोबतच एकमेकांना यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी पेढे भरवले.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून निवडणुकीत जाती धर्माच्या नावावर राजकारण केले जाते. मते मागितली जातात. परंतु मतदार राजा आता जागृत आहे. जनतेला जाती धर्माचे नाही तर विकासाचे राजकारण पाहीजे आहे. आणि ते कर्नाटक राज्यातील जनतेने या निवडणुकीच्या निमित्ताने दाखवून दिले आहे. काॅंग्रेसचा हा विजयरथ यापुढील निवडणुकीत देखील दिसणार आहे अशा भावना यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

यावेळी जल्लोषत्सव साजरा करतांना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य डॉ.राजेश कांबळे, माजी जि.प. सदस्या स्मिताताई पारधी, शहर काँग्रेस अध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी पं.स. सदस्य थानेश्वर कायरकर, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई लोनबले, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिताताई आमले, न.प.नियोजन सभापती महेश भर्रे, अनुसूचित जाती सेलचे तालुकाध्यक्ष प्रमोद मोटघरे, अनुसूचित जमाती सेलचे तालुकाध्यक्ष जगदीश आमले, माजी पं.स. सभापती नेताजी मेश्राम, युवक काँग्रेस शहराध्यक्ष सुरज मेश्राम, बाजार समिती संचालक दिवाकर मातेरे, बाजार समिती संचालक राजेश तलमले, बाजार समिती संचालक अरूण अलोने, बाजार समिती संचालक ब्रम्हदेव दिघोरे, बाजार समिती संचालक प्रेमानंद मेश्राम, माजी सरपंच राजेश पारधी, अनुसूचित जाती अध्यक्ष मुन्ना रामटेके, प्रा.डि.के.मेश्राम, जनसंपर्क अधिकारी सुधीर पंदीलवार, तुलचंद शिंगाडे, प्रविण राऊत, शांताराम रामटेके, सोमेश्वर उपासे, अमोल सलामे, सागर मेश्राम, सुरेश वंजारी यांसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....