कारंजा- राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठिन भारत,राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर, नागपूर, शिक्षण विभाग जि. प.वाशीम,वाशिम जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.11 व 12 जानेवारी रोजी ऑनलाइन जिल्हास्तरीय इंस्पायर अवार्ड प्रदर्शनीचे परीक्षण संपन्न झाले.त्यांचा नुकताच निकाल जाहिर करण्यात आला.सदर निकालात श्री. बाबासाहेब धाबेकर विद्यालयाचा वर्ग 10 वीचा विद्यार्थी यश शंकरराव मांगे याने तयार केलेल्या कंफर्टेबल हॉस्पिटल बेड या प्रकल्पाची निवड राज्यस्तरीय इंस्पायर अवार्ड प्रदर्शनीसाठी झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,वाशिम जिल्ह्यातून 2021-22 मध्ये एकूण 1051 विद्यार्थ्यांनी नामांकन सादर करण्यात आले होते.त्यापैकी 79 विद्यार्थ्यांची निवड जिल्हास्तरीय इंस्पायर अवार्ड प्रदर्शनी करीता झाली होती.त्यांचे 11 व 12 जानेवारी रोजी ऑनलाइन मूल्यांकन झाले.79 पैकी 08 विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरीय इंस्पायर अवार्ड प्रदर्शनी करीता करण्यात आली.त्यामध्ये श्री.बाबासाहेब धाबेकर विद्यालय,यावर्डीच्या यश मांगेची राज्यस्तरीय इंस्पायर अवार्ड प्रदर्शनीसाठी निवड झाली आहे.
सदर प्रकल्प मुख्याध्यापक तथा विज्ञानशिक्षक विजय भड यांचे मार्गदर्शनात यश मांगे याने तयार केला. यश मांगे याच्या प्रकल्पाची निवड राज्यस्तरीय प्रदर्शनी करीता झाल्याबद्दल शाळेचे अध्यक्ष केशवराव खोपे, मुख्याध्यापक विजय भड, शिक्षक राजेश शेंडेकर, गोपाल काकड, अनिल हजारे, शालिनी ओलिवकर, शिक्षकेत्तर कर्मचारी देविदास काळबांडे, भालचंद्र कवाणे, राजेश लिंगाटे, राजु लबळे, राजेंद्र उमाळे तसेच गावकरी मंडळींनी अभिनदंन केले असल्याचे वृत्त संजय कडोळे यांनी कळवीले आहे.