वाशिम : विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाच्या लोककलावंताच्या शिष्टमंडळाने, नुकतेच महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित परंतु कर्तव्यतत्पर असलेले लोकप्रिय खासदार संजय देशमुख यांची भेट घेऊन सर्वप्रथम अध्यक्ष संजय कडोळे तथा पदाधिकारी प्रदिप वानखडे यांचे हस्ते शाल-श्रीफळ-पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.त्यानंतर त्यांचेशी जिल्ह्यातील वृद्ध साहित्यीक व लोककलावंताच्या अडी अडचणी व मागण्यांबद्दल सविस्तर चर्चा करून, जिल्ह्यातील लोककलावंताना केन्द्रशासनाचे मानधन मिळावे. वाशिम जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील वृद्ध साहित्यीक कलाकार निवड समितीने, मार्च 2024 मध्ये कलेचे सादरीकरण व प्रत्यक्ष मुलाखती घेऊन मंजूर केलेल्या वृद्ध लोककलावंताना, राज्यातील सांस्कृतिक कला संचालनालयामार्फत दरमहा पाच हजार रुपये मानधन त्वरीत मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करावा आदी मागण्याचे साकडे खासदार संजय देशमुख यांचेकडे घातले. यावेळी खासदार संजय देशमुख यांनी लोक कलावंता करीता प्राधान्याने मानधन मिळवून देणारच असे आश्वासित केले.यावेळी अजाबराव ढळे, उमेश अनासाने, हभप लोमेश पाटील चौधरी, कैलाश हांडे आदी कलावंताची उपस्थिती होती.