वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे.) केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हमी भावाने रब्बी हंगाम सन 2022-23 ची चना खरेदी सुरू आहे. केंद्र शासनाचे यापूर्वीचे 2 लक्ष 42 हजार 480 क्विंटल चना खरेदीचे दिलेले उद्दिष्ट संपले आहे. त्यामुळे शासनाने 84 हजार 66 क्विंटल चना खरेदीचे वाढीव उद्दिष्ट दिले आहे.
ज्या शेतकऱ्यांनी चना पिकाची विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे,परंतु अद्यापही चना विक्री केली नाही,अशा शेतकऱ्यांना सब एजंट संस्थेमार्फत वाढीव चना खरेदीसाठी त्यांच्या मोबाईलवर एसएमएस पाठविण्यात आले आहे.ज्या शेतकऱ्यांनी चना विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे,त्यांनी संबंधीत चना खरेदी केंद्रावर पिकपेऱ्यानुसार प्रति दिवस 25 क्विंटल याप्रमाणे 100 क्विंटलपर्यंतच्या मर्यादेत चना विक्रीसाठी घेऊन जावा.
तरी चना विक्रीसाठी एसएमएस आलेल्या शेतकऱ्यांनी 11 जूनपर्यंत चना विक्री करावी.असे आवाहन जिल्हाधिकारी, वाशीम आणि जिल्हा पणन अधिकारी यांनी केले आहे.