पुणे :उरळी कांचन येथील ज्येष्ठ समाजसेवक,लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे केंद्रीय मार्गदर्शक पदाधिकारी, प्रवचकार ,अपंग सेवक डॉ. रविंद्र भोळे यांना नुकताच भुतपुर्व राष्ट्रपती,भारतरत्न डॉ.ए.पी. जे. कलाम राष्ट्रीय पुरस्कार जळगाव येथे प्रदान करण्यात आला.आदिल शाह फरुकी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हा पुरस्कार वितरण सणारंभ अल्प बचत भवन हॉल जळगाव येथे झाला.डॉ रविंद्र भोळे यांनी व्यसनमुक्ती,मुक बधिर,मतिमंद,अपंग सेवा,सामजिक ,धार्मिक ,नैसर्गिक आपत्ती,शैक्षणीक,वृक्षारोपन तसेच राज्यभर संस्थात्मक कार्यासाठी सहकार्य केलेले आहे.डॉ. मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट निती आयोग संलग्नीत संस्थेच्या वतीने विविध लोक कल्याणाचे उपक्रम राबवीलेले असून गेली तिस वर्षापासून निष्काम कार्ये करुन राष्ट्रसेवा करीत आहेत . त्यांनाना मिळालेल्या पुरस्काराबद्दल अनेक मान्यवरानी अभिनंदन केले आहे.