बाहेरगाव वरून येणाऱ्या विद्यार्थिनींना शाळेत येण्यासाठी तसेच शाळेच्या दीड किलोमीटर ते पाच किलोमीटर परिसरातील सावित्रीच्या लेकींना शाळेत येणासाठी मानव विकास मिशन अंतर्गत 5 ते 12 विच्या विद्यार्थिनींना सायकल अनुदान देण्यात येतो.
हितकारिणी उच्च माध्य. विद्यालय आरमोरी येथे 57 विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले यासाठी विद्यालयचे मा.काशिनाथ शेबे अध्यक्ष, हितकारिणी शाळा व्यवस्थापन समिती, मा. गोंदोळे उपाध्यक्ष हितकारिणी शिक्षण संस्था,मा. खटकाटे सदस्य हितकारिणी शिक्षण संस्था, मा.लालाभाऊ धोटे सदस्य हितकारिणी शिक्षण संस्था,मा. चंदू जुआरे सदस्य हितकारिणी शिक्षण संस्था,मा. राजेश राहाटे सदस्य शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक मा. जयदास फुलझेले, पर्यवेक्षक बहेकार तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद, शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश धात्रक तर उपस्थितांचे आभार विद्यालयाचे प्राचार्य फुलझेले यांनी मानले