"राजाने मारले आणि पावसाने झोडपले" तर दाद कुणाकडे मागायची अशीच अवस्था या आगस्ट 2022 या महिन्यात शेतकऱ्यांची झाली आहे.मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्तीने मागील हप्त्यात पूर आला त्यामुळे हजारो एकर धानाची शेती नष्ट झाली याला कारणीभूत नैसर्गिक पाऊस व मानवनिर्मित पुरामुळे झाली आहे.
आगस्ट महिन्याच्या सुरवातीला पूर आल्याने काही महसूल विभागाचे अधिकारी शेताच्या बांधावर न जाता प्रत्यक्षात कोणतीही शहानिशा न करता,शेतकऱ्यांना सांगतात इ-पीक करण्यासाठी मोबाईल जिपीएस असायला पाहिजे मग किती शेतकऱ्यांची महसूल विभागाने फोटो काढलेल्या आहेत की पूर्वग्रह वापरून मागील यादी तयार केली ही शंका येत आहे.
दि.15/08/2022 ते 17/08/2022 पर्यंत आलेल्या पावसामुळे पुन्हा तीन दिवस पूरस्थिती निर्माण झाली आणि शेतकरी देशोधडीला गेला शेतातून एकही दाना खायला मिळणार नाही आणि महसूल विभागाच्या वतीने काही व्यक्ती व्हाट्सएपच्या माध्यमातून ज्या व्यक्तीची पुराने नुकसान झालेली आहे त्यांनी महसूल विभागात अर्ज करावा असे मजकुराचा मॅसेज फिरत आहे मग खुर्चीवर बसून असलेले अधिकारी सर्वे न करता पूरग्रस्तांना योग्य न्याय देतील की अर्जाच्या भरवश्यावर यादी सरकारकडे पाठवतील अशी शंका निर्माण होत आहे.
जर सरकारने पूरग्रस्तांना मदत करणार असल्यावरही महसूल विभाग अर्जाच्या भरवश्यावर यादी तयार केली तर"पाकडणाऱ्याला दोन पायल्या व सो म्हणणाऱ्याला पाच पायल्या"अशी म्हण पुन्हा प्रचलित होईल हे सध्याच्या वातावरणावरून दिसून येत आहे.ज्या शेतकऱ्यांची शेती पूरग्रस्त झाली त्यांना कोणतीही माहिती झाली नाही तर काय होईल हे आजचे अधिकाऱ्यांचे आपल्या कर्तव्याला न जागल्याने भयावह स्थिती निर्माण होऊ शकते.