वरोरा,--वरोरा शहरात दोन महिन्यापासून एका अल्पवयीन मुलीकडून देह वापर केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, पोलिसांनी या देह व्यापारात असलेल्या दोन एजंट सह एकूण 11 आरोपींना पोलिसांनी अटक केली, त्यातील एक आरोपी कारागृहात शिक्षा भोगत आहे.
पोलीस अधिकारी यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील एका मुलीची बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली, त्यानुसार पोलीस विभागाने आपले सूत्र बेपत्ता मुलीचा शोध घेणे सुरू केले या शोध कार्यात पोलिसांनी एका व्यक्ती स ताब्यात घेतले असता त्याने शहरात चालत असलेल्या अल्पवयीन मुलीकडून देह व्यापाराची माहिती दिली या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलीचा शोध घेत तक्रार नोंदवून घेतली,
पोलीस अधिकाऱ्यांनी एक एस.आय.टी टीम. गठित करून वरोरा येथील विभागीय पोलिस अधिकारी आयुष् नोपाणी यांच्या मार्गर्शनाखाली या टीम मध्ये दोन महिला अधिकाऱ्यांसह, आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता, या चमूने देह वापरात असलेल्या अन्य आरोपींचा शोध घेत अटक केली काल दिनांक 4 ऑगस्ट ला पोलिसांनी या आरोपींवर गुन्हा दाखल केला त्यात देह व्यापार करण्यास प्रवृत्त करणारे एक महिला व एका नागरिकाचा सहभाग असून 11 लोकांवर पोलिसांनी पास्को,376, देहव्यापार ॲक्ट नुसार गुन्हा नोंदविला , पोलिसानी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता आरोपींना नऊ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली, त्यामूळे या प्रकरणात पुन्हा आरोपींची वाढ होण्याची शक्यता आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे.
मनिष भुसारी वरोरा
आपल्या प्रतिक्रिया द्या....