कारंजा : पोस्टे कारंजा शहर येथे दि. 13/03/2023 रोजी फिर्यादी प्रशिणकुमार खुशालचंद गुप्ता व्यवसाय असिस्टेन्ट मॅनेजर ब्ल्यु डार्ट कंपनी (कुरिअर सेवा) रा. काटोल रोड नागपुर यांनी पोस्टे येऊन तक्रार दिली की, त्यांचे कारंजा येथील ब्ल्यु डार्ट कंपनी ( कुरिअर सेवा) कारंजा येथील मॅनेजर शुभम सुभाष कांबळे रा मुर्तीजापुर यांनी फिर्यादी यांना फोन करुण माहीती दिली की, ऑफीस मधुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने दि. 11/03/2023 चे रात्री दरम्यान ऑफिस शटर से कुलूप कापूण आत प्रवेश करून ऑफीस मधील एकूण 13 पार्सल 32,394/- रु चे तसेच ऑफीसचा जुना वापरता डेल कंपनीचा लॅपटॉप की 40,000/- रु लोखंडी अलमारीचा मागील पत्रा कापून नगदी 2,48,753/ - असा एकूण 3,21,147/- रु चा माल कोनीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. अशा रिपोर्ट वरुन गुन्हा दाखल करून तपासात घेतला.
तपासा दरम्यान सदर कुरिअर सेवा ऑफीस मधील कर्मचारी यांचेवर संशय आल्याने त्यांना विश्वासात घेऊन त्याचे वेगवेगळे जवाब नोंदविले असता सदर कुरिअर ऑफीसमधील शुभम सुभाष कांबळे रा. मुर्तीजापुर याने त्याचा मुर्तीजापुर येथील मित्र ऋषीकेश शंकरराव हिवराळे यांचे मदतीने सदरची चोरी केल्याचे कबुली दिल्यावरून त्यांना अटक करण्यात येवून त्यांचे ताब्यातून नगदी 1.70,000/- 13 पार्सल पैकी 02 पार्सल की. 2700/-, तसेच लोखंडी आलमारी कापण्याकरिता वापरलेली ग्राइंडर मशीन की 2000/- असा एकुण 1,74,700 चा माल हस्तगत करण्यात आला असून गुन्हयात चोरी गेलेला इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात येत आहे .
सदरची कार्यावाही ही मा.पोलीस निरिक्षक श्री आधारसिंग सोनोने साहेब पोस्टे कारंजा शहर यांचे मार्गदर्शनात पोउपनि बि.सी.रेघीवाले ना पो का उमेशकुमार विवेकर ब.नं. 1017, पोका अमित भगत ब.न.311. नितीन पाटील ब.नं.338. गजानन शिंदे बन.1409, पो हे कॉ बाळू ढगे ब. न.102 यांनी केली असुन पुढील तपास पोउपनि बि.सी. रेघीवाले करीत आहेत. कारंजा शहर पोलिसांनी पोलिस निरिक्षक आधारसिह सोनोने यांच्या मार्गदर्शनात तात्काळ कार्यवाही करीत अत्यंत शिताफीने चोरी प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात व चोरी गेलेला माल परत मिळविण्यात यश मिळविल्याने त्यांचे कौतुक होत आहे.