अकोला -महावितरण कपंनीकडे ग्राहकांनी नवीन जोडणी साठी गेली ५ ते ६ महिन्यापासून अर्ज केले असून ठेव म्हणून पैसाचा भरणा सुद्धा केला आहे परंतु मीटर उपलब्ध नसल्यामुळे भर उन्हाळ्यात मीटर अभावी जोडन्या बंद असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सोसावा लागत आहे त्यामुळे कपंनी विरोधात असंतोष पसरला आहे,तसेच ज्यांना तात्काळ मीटर पाहिजे असतील त्यांनी मार्केट मधून मीटर विकत आणावे असा सल्ला महावितरणचे अधिकारी देत असून ग्राहकांना आठशे रुपयाचे ऐवजी दोन ते अडीच हजार रुपयांचा विनाकारण भुर्दंड सहन करावा लागत असून त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.त्यामुळे महावितरण कपंनीने तात्काळ मीटर उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपा नेते डॉ अशोक ओळंबे,प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा महाराष्ट्र यांनी एका निवेदनाद्वारे अधीक्षक अभियंता श्री कछोट साहेब यांचेकडे केली असून तात्काळ कार्यवाही करून ग्राहकांना न्याय देण्याची विनंती केली.तसेच मीटरचा तुटवाडा भासणार नाही यासाठी नियोजन करावे असे सांगण्यात आले अन्यथा ग्राहकांच्या वतीने महावितरण कपंनीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.यावर अधीक्षक अभियंता श्री कछोट यांनी तात्काळ कार्यवाही करून इलेक्ट्रिक मीटर उपलब्ध करून ग्राहकांना उद्यापासूनच मीटर लावून देण्याचे आदेश सबंधिताना दिल्याचे सांगितले.यावेळी नागरिकांच्या वतीने डॉ अशोक ओळंबे यांनी महवितरण कपंनीचे कार्यकारी अभियंता श्री पाचपाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले .यावेळी नारायण उंबरकर, सचिन पाटील, डॉ राजेश वर्धेकर,दीपक गवारे, विजय मोटे, प्रभाकर वानखडे,प्रकाश नानकदे,संजय देशमुख, सचिन काकड,आशिष शर्मा,सचिन बोरेकर, किशोर मानकर, राजू थोरवे, सुरेश अंधारे,सोनू उज्जेणकर,महेंद्र बलोदे,आशुतोष काटे,यांचेसह बहुसंख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती,