वरोरा :---
वरोरा तालुका तसे पाहिले तर शांतप्रिय म्हणून ओळख परंतु या भागात या चार वर्षात अनेक अवैध धंद्याला पोलीस अधिकाऱ्यांचा असलेला छुपा पाठिंबा यामुळे शहरातच नव्हे तर खेडोपाडी अवैध दारूविक्री, सट्टा पट्टी, अवैध वेश्या व्यवसाय याला सुगीचे दिवस आलेले आहे,गावातील महिला ,लहान मुले ही या अवैध व्यवसायामुळे सुरक्षित रहात नसल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहेकाही दिवसांपूर्वी दहेगाव या गावी अवैध दारुव्यवसायकांचा दारूचा व्यवसाय सुरू असल्याने अखेर गावातील महिलांनी या विरोधात एल्गार उभारत पोलीस स्टेशन गाठले .
आज दि 8जून ला मौजा आशी या गावातील महिलांनी शरद परचाके,मंगेश हनुमान उईके याची पत्नी, भास्कर भोयर,बंडू खोंडे हे गावात,तसेच तुकडोजी महाराज मंदिराच्या खाली दारूची खुलेआम विक्री करत असून, गावातील महिला ये जा करताना शिवीगाळ करणे,महिलांची टिंगल टवाळी करणे असे प्रकार घडू लागले आहे ,अवैध दारू विक्रीमुळे गावातील अनेक कुटुंब उध्वस्त होत असून कुटुंबात तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे ,गावात शिल्लक कारणावरून भांडण तंटे यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे सदर बाब शासकीय यंत्रणेच्या निदर्शनात येत असूनही पोलीस विभाग याकडे सक्षम दुर्लक्ष करीत आहे या संदर्भात काही महिलांना विचारणा केली असता महिलांनी या संदर्भातही माढेली बिट जमादार याना माहिती देण्यात आली होती मात्र या दारू विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई होत नसून या दारू विक्रेत्यांकडून बीट जमादार हा हप्ता घेत असल्याचे महिलांनी सांगितले तसेच दारू विक्रेते पोलिस आमचे काही बिघडवू शकत नाही आम्ही त्यांना हप्ते देतो असेही महिलांना विचारणा केली असता सांगितले त्यामुळे एकंदरीत तालुक्यात अवैध धंद्यांना ऊत आला असून या सर्व अवैध धंद्यांना अंकुश लावण्यात पोलीस असमर्थ दिसत असल्याचे दिसून येत आहे आशि गावातील महिलांनी अखेर दिनांक 1एप्रिल ला ग्रामसभा घ्यावी लागली , या ग्रामसभेत हा विषय मांडून गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याबाबतचा सर्वानुमते ठराव घेण्यात आला या संदर्भातील निवेदन असंख्य महिला सहित गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कळस्कर, उपसरपंच सोपान ठावरी, सरपंच जयमाला भोयर, बचत गटाच्या संगीता कोल्हे वेधराम कोल्हे यांच्यासह असंख्य महिलांनी पोलीस स्टेशन गाठत या संदर्भात निवेदन दिले.
तपासणी करीता माढळी बिट जमादार यास पाठवू नका अशी महिलांची मागणी ठाणेदार अमोल काचोरे याना निवेदन देताना अशी विनंती ठाणेदारांना केली
सट्टा पट्टी घेणाऱ्या ची आईही महिलेसोबत अशा गावातील अवैध सट्टा पट्टी घेणाऱ्याची आईही या महिलेसोबत आली असून गावातील हे अवैध धंदे बंद करण्याची मागणी तिने प्रतिनिधी शी बोलताना केली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....
=================================
Post Views: 1229