वाशिम : नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सोमवार दि. २३ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे व उपजिल्हाधिकारी नितीन चव्हाण यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. यावेळी जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार ,नायब तहसीलदार कैलास देवळे,सविता डांगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांच्यासह ईतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांनी सुध्दा यावेळी पूष्प अर्पण करुन अभिवादन केले. असे वृत्त प्राप्त झाले असल्याचे संजय कडोळे यांनी कळवीले.