शहरातील टिळक चौक येथे युवारंग तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले निशुल्क शिकवणी वर्गाची सुरुवात ४ ऑगस्ट २०२२ ला करण्यात आली होती या शिकवणी वर्गाची पालक सभा आज दिनांक १८ सप्टेंबर २०२२ रविवार ला सायंकाळी ठीक ६:००वाजता पार पडली या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून युवारंग महिला कमिटीच्या प्रमुख मा.चंदाताई राऊत तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून स्वय रक्तदाता गडचिरोली जिल्हा समितीचे अध्यक्ष मा.चारुदत्त राऊत सर तसेच युवारंग चे उपाध्यक्ष मनोज गेडाम, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वाचनालय व अभ्यासिकेचे अध्यक्ष मा नेपचंद्र पेलणे उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले व शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले कार्यक्रमाची संचालन अजय कुथे यांनी केले तर आभार सुमित खेडकर यांनी मानले याप्रसंगी युवारंग चे सदस्य व वार्डातील पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते