वाशिम : खऱ्या अर्थाने साहित्यीक,कलाकार, लोककलावंत हे केन्द्र व राज्यशासनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा प्रचार प्रसार आणि समाजातील अनिष्ट प्रथा, हुंडाप्रथा, निरक्षरता,अंधश्रद्धा,व्यसनमुक्ती निर्मूलन,बेटी बचाव बेटी पढाओ, वृक्षारोपण,देहदान,रक्तदान बद्दल सामाजिक जनजागृती करीत असतात.शिवाय आपल्या क्रांतिकारक देशभक्त महापुरुषांचा इतिहास आपल्या लिखाणातून,कथा-किर्तन प्रवचन-शाहीरी-पोवाडे-लोकगीतेकाव्य-भिमगीते,गोंधळ जागर-दंढार-कलापथक -कव्वाली-लोकनाट्य-नृत्यनाट्यामधून,आपल्या समाजाचे मनोरंजनासोबत समाज प्रबोधन करीत असतात.निवडणूक काळातही विविध राजकिय पक्ष हे अनेक ठिकाणी किर्तनकार -प्रवचनकार-शाहिर-भिमशाहिर -व्याख्याते-भजनीमंडळे आदींचे, नागरीकांची गर्दी खेचणारे कार्यक्रम आयोजीत करून आपला स्वार्थ साधून घेत असतात.परंतु एकदा का निवडणूका संपल्या की त्यांना किर्तनकार,प्रवचनकार,व्याख्याते लोककलावंत यांचा विसर पडतो. समाजप्रबोधकार, साहित्यीक,किर्तनकार प्रवचनकार,शाहिर ,भिमशाहिर, लोककलावंत हे सहसा तळागाळातील, दारिद्रयरेषेखालील,ग्रामिण भागातून आलेले असतात. त्यांच्याही मागण्या किंवा समस्या सोडविणे हे शासना बरोबरच प्रत्येक राजकिय पक्षांचे, राजाकिय नेत्यांचेही कर्तव्य असते.त्यामुळेच वृद्धापकाळी लोककलावंताना मानधन मिळावे. ; सद्यस्थितीत मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनात महागाईला अनुसरून मानधन वाढ व्हावी. ; गेल्या पाच वर्षापासून स्थगीत असलेल्या, जिल्हा वृद्ध साहित्यीक कलाकार निवड समितीची विद्यमान पालकमंत्री महोदयांनी पुनर्रचना करून,पाच वर्षापासून मानधना करीता देण्यात आलेले कलावंताचे प्रलंबीत प्रस्ताव मंजूर करण्यात येऊन कलावंताना दरमहा मानधन सुरु करण्यात यावे.मृतक कलावंताच्या वारसदार यांना वारसाहक्काने मानधन मिळावे ह्या हक्काच्या रास्त मागण्यांकरीता कलावंताचे क्रांतिकारी धरणे आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रांगण वाशीम येथे बुधवार दि. 24 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11:00 ते 05:00 ह्या वेळेत होणार आहे.करीता ह्या आंदोलनाला राजकिय पक्षांचा पाठींबा मिळावा म्हणून जिल्ह्यातील सर्वच राजकिय पक्षांनी आणि राजकिय नेत्यांनी कलावतांच्या क्रांतिकारी धरणे आंदोलनाला पाठींबा देऊन विविध मागण्यांबाबत पालकमंत्री महोदय आणि जिल्हाधिकारी मॅडम यांचेशी चर्चा करून, जिल्ह्यातील वृद्धापकाळाच्या उंबरठ्यावर हलाखीचे जीवन जगणाऱ्या कलावंताना न्याय मिळवून देण्याची विनंती, जिल्ह्यातील कलावंताच्या वतीने,विदर्भ लोककलावंत संघटनेने अध्यक्ष (महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त लोककलावंत) संजय कडोळे यांनी सर्व राजकिय पक्षांना केली आहे.