वाशीम जिल्ह्यातील पावसाने शेतकरी राजा सुखावला.घाट माथ्याच्या शेतातील पिक परिस्थिती उत्तम.
वाशीम: वाशिम जिल्ह्यासह, पूर्व व पश्चिम विदर्भात,गेल्या दोन तिन दिवसांपासून चांगला पाऊस बरसत असल्याने, पिकांना नवसंजीवनी मिळाली असून, शेतकरी ग्रामस्थांकडून सद्यस्थितीत समाधान व्यक्त होतांना दिसत आहे. या संदर्भात जिल्ह्यातील कारंजा मानोरा भागातील ग्राम रुई गोस्ता येथील शेतकरी पुत्र असलेले हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ पाटील (गावंडे) यांनी स्पष्टपणे सांगीतलेले व 'शेतकरी मित्र' म्हणून ओळखले जाणारे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या विदर्भ प्रदेश कार्यकारिणीचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी जिल्ह्यातील वृत्तपत्रामधून प्रसिद्ध केलेले गोपाल गावंडे यांचे यावर्षीचे सर्वच अंदाज अचूक ठरलेले आहेत. विशेष म्हणजे,आपल्या चांगल्या अंदाजा वरून,यावर्षीची पिक परिस्थिती सुद्धा चांगली रहाणार असून त्यामुळे शेतकरी राजाच्या घरात भरपूर धान्य येणार असल्याची भविष्यवाणी देखील त्यांनी केली असल्याने अन्नदाताही सुखावला आहे. त्यांच्या हवामान अंदाजानुसार, कारंजा,मानोरा तालुक्यासह वाशिम,अकोला,यवतमाळ, हिंगोली जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भात बुधवारी दि.१३ ऑगस्ट २०२५ रोजी संपूर्ण दिवसभर व रात्री दमदार पाऊस झाल्याचे वृत्त असून,दि १४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २:४५ पासून जिल्ह्याच्या बहुतांश भागात धुवांधार पाऊस होत आहे.शिवाय रात्रीला देखील पाऊस होण्याचे संकेत असून, बहुतांश भागात दि.१५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळपासूनच पावसाला सुरुवात होण्याचे संकेत आहेत. त्याचा परिणाम स्वातंत्र्य दिनाच्या सकाळच्या कार्यक्रमांवरही होऊ शकतो.शिवाय शुक्रवारी,१५ ऑगस्ट २०२५ रोजी काही भागात दिवसा पाऊस होण्याची शक्यता आहे. हा पाऊस दि. १५ ते २२ ऑगस्ट पर्यंत निवडक भाग सोडून,अनेक भागात, सोसाट्याचा वारा आणि विजांच्या लखलखाटासह होणार असल्याने काही भागात बारीक सारीक तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.त्यामुळे शेतकरी,गुराखी,मेंढपाळ, प्रवाशी,नोकरदार चाकरमाने यांना व सोबतच्या प्रवाशांना इत्यांदींना सावधगीरीचा इशारा देण्यात येत आहे.दरम्यान अनेक ठिकाणी पुर परिस्थिती निर्माण होण्याची संभावना असून, धरणामधून पाण्याचा विसर्ग करण्यात येईल.त्यामुळे नागरीकांनी पुरातून स्वतःही जाऊ नये.व आपली दुचाकी, चारचाकी वाहने,महामंडळाच्या व शाळेच्या स्कूल बसगाड्या काढू नये.विजा चमकत असतांना मोबाईल बंद करून ठेवावे.संवाद टाळावा.विजा चमकतांना शेतात व हिरव्या झाडाच्या आश्रयाला चुकूनही थांबू नये.आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षा करावी. पावसाळ्यात जलजन्य व संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी. प्रकृती अस्वस्थ वाटत असल्यास,जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र,उपजिल्हा रुग्नालय किंवा आपल्या कौटूंबिक डॉक्टरांचा सल्ला घेवून लगेच उपचार घ्यावे.असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे दिदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांनी केले आहे.