मानोरा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : महानायकनिमित्त कै. वसंतरावजी नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने, ग्राम रुईगोस्ता गावातील महानायक कै वसंतरावजी नाईक यांच्या पुतळ्याचे पूजन व हारार्पण करून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कै.वसंतरावजी नाईक साहेबांची पुण्यतिथी म्हणजेच अर्थात पुऱ्या महाराष्ट्रभर "कृषी दिन" म्हणून साजरा केला जातो. या कार्यक्रमाकरिता भारत राठोड (अधिकारी) हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते प्रमुख पाहुणे म्हणून अशोक रणबावळे श्री गुरुदेव सेवाश्रमचे सचिव,विजुभाऊ राठोड पुसद, समाधान भाऊ राठोड पुसद तर,सत्कारमूर्ती असलेले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सर्व गुरुजी व दुसरी सत्कारमूर्ती अनेक वर्षापासून गोरगरिबांना मदत करतात गरजू लोकांना मदत करतात असे अनिल भाऊ नाईक उपसरपंच पोहरा (देवी) यांची प्रमुख उपस्थिती होती.श्री गुरुदेव सेवाश्रम इंग्लिश स्कूल येथे हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाकरिता उपस्थित रूई येथेल उत्तम राठोड ,संतोष राठोड , दिनेश राठोड , संजय राठोड ,पंजाब राठोड , विनोद राठोड ,शेषराव चव्हाण, सूर्यभान जाधव , सप्तखंजेरी प्रबोधनकार पंकजपाल महाराज राठोड आणि सावन गुरुजींनी आपलं मनोगत व्यक्त केलं. मान्यवरांनी कै वसंतरावजी नाईक यांच्या जन्मकाळा पासून तर समाजसेवेकरीता ते कार्य करीत असताना अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी माहिती दिली.लहान मुलांना संस्कार देण्याविषयी पंकजपाल महाराज राठोड यांनी प्रबोधन केले.सेवा इंग्लिश स्कूल रुई गोस्ता येथे लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्य उद्घाटन सुद्धा यावेळी करण्यात आले. याप्रसंगी गावातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.