कारंजा : स्वतःच बेघर असून आणि स्वतःची परिस्थिती हलाखीची असतांनाही समाजाच्या डोळ्यातील अश्रू टिपून त्यांचे सांत्वन करीत धिर देणारे सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे हे दरवर्षी निराधारांना दिवाळी निमित्त सहकार्य करीत असतात .
यंदाही त्यांनी, काही दिवसाच्या अंतरा अंतराने एका पाठोपाठ आई सुमनबाई, मोठे भाऊ विजय राऊत, वडील महादेव राऊत, भाचे धिरज राऊत, वहिनी राजामतीताई यांच्या मृत्युमुळे अक्षरशः अनाथ व निराधार झालेल्या अर्चनाबाई यांचे सांत्वन करीत, दिपावली निमित्त त्यांना किराणा, कपडे आणि एक हजार रुपये रोख रक्कम देऊन त्यांना हातभार लावला.
स्वतः आर्थिक अडचणीत असतांनाही आपल्या घासातला घास देऊन इतरांचे दुःखाश्रू पुसण्याचा प्रयत्न संजय कडोळे हे स्वबळावर करीत असतात. यावेळी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे सचिव विजय पाटील खंडार, उमेश अनासाने, ज्येष्ठ पत्रकार आरिफ पोपटे,ओंकार मलवळकर, विनोदकुमार गणवीर, मोनाली मॅडम तथा इतरांची उपस्थिती होती.