ब्रम्हपुरी/प्रतिनिधी
तालुक्यातील आवळगाव येथे खास नवरात्रीनिमित्त शिवशक्ती नवतरुण उत्साही सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ इंदिरानगर, आवळगाव यांच्या वतीने विदर्भ स्तरीय खुली नृत्य स्पर्धेचे आयोजन १७ ऑक्टोबर २०२३ ला रात्रौ ८. वाजता करण्यात आले होते. या विदर्भ स्तरीय खुली नृत्य स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते पार पडले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आवळगावचे सरपंच भास्कर बानबले तर सहउद्घाटक म्हणून ग्रा.पं. सदस्य प्रीतम बावनवाडे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून रुपेश बानबले युवक कॉ.क. सरचिटणीस, शामलाताई खेवले ग्रा.पं.सदस्या, कुनिताताई तिवाडे ग्रा.पं.सदस्या, शुभम भैसारे, ज्ञानेश्वर झरकर संचालक कृ.उ.बा.स., रामदास कामडी त.मु.अध्यक्ष, महेंद्र नावक्त्कार, दयाराम खेवले, रामदास भोयर, अशोक जनबंधू, अतुल जीवतोडे,शामलाताई चौधरी, देवराव भैसारे, आशाताई भोयर, अंकित नंदेश्वर, रवी अम्बोरकर,मारोती घुले, अरुण उंदिरवाडे, खेमराज उरकुडे, केवळ गुरनुले,भास्कर सातपुते, प्रवीण दर्वे, अशोक गिरडकर व अन्य मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
_या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमोदभाऊ चिमूरकर म्हणाले की, संगीत, नृत्य, नाटक, कला आणि साहित्य यासह विविध क्षेत्रांमध्ये त्यांची प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी असे सांस्कृतिक कार्यक्रम एक व्यासपीठ प्रदान करतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही तरी कला गुण आहेत. ते कलागुण मुलांनी जाेपासावे, त्यातून मिळणारा जीवनाचा आनंद घ्यावा. सदैव सकारात्मक जीवन जगावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती भारतीय सैनिक रोशन विजय राऊत, हिमांशु देवराव भैसारे, अग्निविर शुभम अंबादास भैसारे यांचा सत्कार करण्यात आला. ही स्पर्धा सामुहिक व व्ययक्तिक गटात आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये हजारोंची बक्षिसे ठेवण्यात आली होती.
आपल्या प्रतिक्रिया द्या....