मद्य प्राशन करून वाहन चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले. ही कारवाई साकोली, लाखनी, पवनी व भंडारा पोलिस ठाणे अंतर्गत करण्यात आली. भंडारा पोलिस ठाणे अंतर्गत दुचाकी चालक परसराम पतिराम कुथे (५७, रा. एकलारी, वरठी), पवनी पोलिस ठाणे अंतर्गत दुचाकी चालक डेव्हीड दुर्योधन गोस्वामी (४२, रा. सोनेगाव), लाखनी पोलिस स्टेशन अंतर्गत निहाल आनंदराव कोरे (२५, रा. पाथरी), साकोली पोलिस ठाण्याअंतर्गत दुचाकी चालक उत्सव लेखराम कठाणे (२१, रा. डोंगरगाव साक्षर) व दुचाकी चालक हरीचंद शिवचरण (५२, रा. सानगडी) यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.