कारंजा :कारंजा शहरातील नव्याने उदयास आलेल्या वस्तीत विद्युत पुरवठा देण्यात यावा यामागणीसाठी टिपु सुल्तान सेनेचे वाशिम जिल्हा अध्यक्ष अब्दुल राजीक अब्दुल अजीम, यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कारंजा शाखेचे उपकार्यकारी अभियंता राजपूत साहेब यांना निवेदन दिले आहे,सदर निवेदनात असे म्हटले आहे की,कारंजा शहरातील नव्याने उदयास आलेल्या रहीवाशी वस्ती म्हणजेच गांधीनगर, पटेलनगर, साटोटे नगर या परिसरात गोरगरीब लोक राहत असून या लोकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे, सदर परिसरात कुठल्याही प्रकारचे विद्युत कनेक्शन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कडून देण्यात आलेले नाही.
या परिसरात डि.पी. बसविणे अत्यावश्यक आहे.या परिसरा लगत शेती असल्याने या परिसरात रात्रीबेरात्री सरपटणारे प्राणी साप, विंचु यांचा वास्तव जास्त प्रमाणात असल्याने जीवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, सदर ठीकाणा वरील गोरगरिब लोकांना उजेडात आणण्याकरिता आपल्या स्तरावरुन योग्य ते प्रयत्न करावे व त्यांना विदयुत कनेक्शन उपलब्ध करुन द्यावे, असे निवेदनात म्हटले आहे, यावेळी टिपु सुल्तान सेनेचे वाशिम जिल्हा अध्यक्ष अब्दुल राजीक अब्दुल अजीम,कुष्ण भाऊ इंगळे, वाहेद शाह, मोहम्मद शहा,शफीक भाई ,ईश्वर भाऊ, अमोल भाऊ, याकूब भाई यांच्या सह मोठ्या संख्येने सदर परिसरातील नागरिक उपस्थित होते