स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला या राष्ट्रीयकृत सामाजिक संस्थेच्या माध्यमांने प्रा.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात रंगपंचमी निमित्त 18 मार्च 2022 रोजी विविध सामाजिक उपक्रम संपन्न झाले. चित्रांगन फाउंडेशन च्या अध्यक्षा राजश्री नाथक यांचे मानवी जीवनात रंगाचे महत्व या विषयावर ऑनलाईन व्याख्यान संपन्न झाले. दिल्लीतील राजश्री नाथक दिव्यांग सोशल फाउंडेशन च्या सदस्य असून दिव्यांगांना रोजगार मिळावा यासाठी संपूर्ण भारतभर कार्य करीत आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित असणाऱ्या चित्रकार म्हणून त्यांची ख्याती असून आपल्या व्याख्यानात जलसंवर्धन, वृक्ष लागवड व दिव्यांग शिष्यवृत्ती योजना या बद्दल संविस्तर मार्गदर्शन केले. अकोल्यात दिव्यांगांसाठी रोजगार कार्यशाळेचे आयोजन केले जाणार आहे.कार्यशाळेत सहभाग नोंदवण्यासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या हेल्पलाइन क्रमांक 09423650090 वर संपर्क साधावा. असे आव्हान श्री.प्रसाद झाडे यांनी केले आहे.