अमरावती : ग्राम इंदोरे जि. नाशिक येथील श्री पंचमुखी हनुमान आश्रमाच्या मठाधिश असलेल्या महंत साध्वी भगवत्दास श्री श्री १००८ विजयादेवी ह्या गुरुकुंज आश्रम मोझरी येथील श्री गुरुदेव सेवाश्रमाच्या आजिवन प्रचारिका आहेत. कारंजा (लाड) येथून, वर्धा जिल्ह्यातील
मांडवा येथे दि. २९ मार्च पासून सुरु होणाऱ्या, नऊ दिवसीय, श्रीरामचरितमानस ग्रंथावरील संगीतमय श्री रामकथा महोत्सवाकरीता जात असतांना, मार्गात त्यांनी दि.२८ मार्च रोजी श्री गुरुकुंज मोझरी येथील श्री गुरुदेव सेवाश्रमाला भेट देवून, राष्ट्रसंत गुरुदेवाच्या पवित्र पावन समाधी स्थळाचे दर्शन घेतले.
तसेच सामुदायिक प्रार्थनेला सुद्धा हजेरी लावली. यावेळी पूज्य साध्वीजींनी मार्गदर्शन केले.तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला असे वृत्त प्रत्यक्षदर्शी-विजय पाटील खंडार यांनी, महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळवीले आहे.