वाशिम : महामानव विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमांतून दोन वर्षे अकरा महिणे व सतरा दिवस राबून त्यांनी या देशाला भारतीय राज्य घटना दिली. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी आपण भारतीय संविधान स्विकारून स्वतःप्रत स्वतःलाच अर्पण करून घेतले व संविधानावर आधारित लोकशाही देशात सुरू झाली, जनतेच्या प्रती आदरभाव ठेऊन पारदर्शक कारभार करून देशाप्रती कर्तव्याची जाणीव ठेऊन लोक सेवक म्हणून जनतेची कामे करण्यासाठी शासकीय कार्यालयात दर्शनी भागात भारतीय संविधान प्रास्ताविका लावण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दर वर्षी भारतीय संविधान प्रास्ताविका मोफत उपलब्ध करून दिली जाते, या कार्याला बावीस वर्षे पूर्ण होत आहेत. दरवर्षी
वाशिम शहरातील सर्व शासकीय/निम शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागात भारतीय संविधान प्रास्ताविका लावण्यासाठी कार्यालय प्रमुख/अधिकारी यांना भेट देण्यात येते.
या वर्षी देखील सोमवार दि. २१ नोव्हेंबर पासून २५ नोव्हेंबर पर्यंत भारतीय संविधान प्रास्ताविका कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन देण्यात येणार आहे. व २६ नोव्हेंबर संविधान स्विकृती दिनी आदर्श जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संविधान गौरव रॅली संविधान निर्माते, महामानव विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सामुहिक संविधान प्रास्ताविका वाचण करण्यात येणार आहे. या रॅली मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मूकनायक विचार मंच, शाळा बचाव समिती व समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा अध्यक्ष तथा अशासकीय सदश्य जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समिती वाशिमचे डाॅ. रामकृष्ण कालापाड, उपाध्यक्ष डाॅ. एम.बी. डाखोरे, मूकनायक विचार मंचाचे अध्यक्ष राजीव दारोकार, उपाध्यक्ष सुखदेव काजळे, बालाजी गंगावणे, कुसुमाताई सोनुने, मायाताई भोजणे, नीलेश भोजणे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती तथा अशासकीय सदश्य जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार अमलबजावणी समिती वाशिम चे शाहिर दत्ताराव वानखेडे, शाहिर शेषराव मेश्राम, अंनिसचे जिल्हा सचिव प्रा. महेश देवळे,विविध उपक्रम विभाग कार्यवाह नाजुकराव भोंडणे, सुनील वैद्य, बाबाराव गोदमले, केशवराव शिंदे, शेख अन्सार, शाळा बचाव समितीचे गजानन धामणे, प्रा. मंगेश भुताडे,सल्लागार विजयराव शिंदे, आदीसह संविधान प्रचारक मंडळी तसेच पत्रकार मंडळी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे वाशिम जिल्हाध्यक्ष संजय कडोळे इ सहभागी होणार असल्याचे पी एस खंदारे जिल्हा कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तथा अशासकीय सदश्य जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समिती वाशिम आणि जिल्हा महासचिव
शाळा बचाव समिती वाशिम, यांनी आवाहन केले आहे. असे वृत्त प्रसिद्धी प्रमुख संजय कडोळे यांनी कळविले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....