अकोला:- अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक लि., अकोला ही अमरावती विभागातून सर्वोत्कृष्ट बैंक ठरली असून, बँकेला सन २०२३-२०२४ चा के. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक व सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबाबत बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे यांना दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक्स असोसिएशन लि., मुंबई यांच्याकडून राज्यस्तरीय अत्यंत मोलाचा मानण्यात येणारा के, विष्णू अण्णा पाटील जीवन गौरव पुरस्कार अशा दोन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हे दोन्ही पुरस्कार डॉ. संतोषकुमार कोरपे यांना बुधवार २३ जुलै रोजी मुंबई येथे आयोजीत एका भव्य कार्यमात राज्याचे सहकार राज्य मंत्री डॉ. पंकज भोयर, बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष
सी.ए. भाऊ भगवंत कड व कोकण विभागाचे महसुल आयुक्त डॉ. विजय सुर्णवंशी, असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रचित पोरेड्डीवार या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी मान्यवरांची समायोजित भाषणे झाली. तीन पिढ्यापासून कोरपे परिवाराने जिल्ह्यासह राज्यातील सहकार चळवळ अधिक गतीमान केली असून, सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण तसेच शहरी भागाचा आमुलाग्र विकास घडविला आहे. या भरीव यशाचे भगीरथ म्हणून बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे यांना हा पुरस्कार देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
कोरपे परिवाराच्या दुसऱ्या पिढीतील डॉ. संतोषकुमार कोरपे यांनी त्यांच्या वडीलांनी उभी केलेली सहकार चळवळ अधिक गतीमान करत त्यांच्यावर आलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडली. त्यांच्या नेतृत्वात जिल्हा बँकेचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. सेवा
सहकारी सोसायट्यांदेखील सक्षम होवून त्यामुळेय आज ग्रामीण व शहरी भागातील शेतकरी व सामान्य नागरीक यांच्यात आर्थीक सुबत्ता पाहावयास मिळत आहे. डॉ. संतोषकुमार कोरपे यांच्या या कार्याची दखल भोत दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक्स असोशिएशनने बँकेची व त्यांची पुरस्कारांसाठी निवड केली आहे.
खुल्या अर्थव्यवस्थेतही बँकेचा ग्राफ चढताच राहिला आहे
वा यामुळे १९९० मध्ये आलेल्या खुल्या अर्थव्यावस्थेच्या सहकारी बँकांचे अस्तित्व धोक्यात आले होते. सहकारी बैंकासह इतर आंतरराष्ट्रीय बँकांचे जाळे देशभरात पोहोचायला सुरुवात झाली होती, अगदी पाच काळात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा काटेरी मुकूट डॉ. संतोषकुमार कोरपे यांच्या डोईवर आला होता. तथापि शिस्त, नियोजन आणि अंमलबजावणी अशी त्रिसूत्री ठरवून कामाला सुरुवात केली. सहकारी
संस्थां पुढे येतांना किंबहुना बँकिंग करणा या सहकारी बँकांवर असलेले रिझव्ह बँक, नाबार्ड आणि राज्य शासन यांच्या नियंत्रण तसेच कसोट्या पार करून बैंक यशोशिखराकडे वाटचाल करीत आहे. ही किमया अध्यक्ष डॉ. संतोष कुमार कोरपे यांनी सहजपणे करून दाखविल्यामुळे त्यांना एक नव्हे, दोन नत्रो तर तीन पुरस्कार जाहीर झाले आहेत. नुकतेच नाबार्डनेसुध्दा त्यानी दखल घेवून उत्कृष्ट बँक म्हणून अकोला-वाशिम जिल्हा बँकेला
सन्मानीत केले आहे. तरुण व महिलांनी पुढे यावे
सहकाराला अधिक बळकटी आणण्याकरिता तरुणांनी तसेच महिलांनी पुढे येण्याची गरज आहे. तरुणांतून उधोजक निर्माण झाले पाहिजे. महिलांनीदेखील बँकेच्या आर्थिक मदतीने लघु उधोग, कुटीरोयोग, उभारावे, असे आवाहन पुरस्काराला उत्तर देताना डॉ.
संतोषकुमार कोरपे म्हणाले. सहकार वाढविण्याचे भरीव प्रयत्न
सहकार चळवळ वाढीस लागून ग्राम, तहसील तसेच जिल्हास्तरावर जाळे विणले जाने. गातून प्रत्येक घटकाचे आर्थीक जीवनमान सुधारावे, यासाठी राज्यासह केंद्र सरकार भरीव प्रपत्न करीत असल्याचे सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यावेळी म्हणाले. तसेच महिलांना प्रोत्साहन म्हणून पुरस्कार दिले जावे, त्यांना वगळता येणार नाही, असेही ते म्हणाले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....