राजेन्द्र पाटणी साहेब यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंढे यांच्या कडे वाशिम जिल्हयातील शेतकऱ्यांना 25% पिक विमा रक्कम देण्याबाबत मागणी केली असता राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंढे यांनी अ. मू . सचिव (कृषी ) यांना वस्तुनिष्ठ अहवाल तपासून सादर करण्याचे सांगितले. आमदार राजेंद्र पाटणी यांनी या संदर्भात दिलेल्या पत्रात वाशिम जिल्हयाबाबत कोणताही भेदभाव न करता पिक विमा देणेबाबत विमा कंपनीस महाराष्ट्र राज्याचे कृषि मंत्री या नात्याने सुचित करावे असे सांगितले होते.कारंजा मानोरा विधान सभा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी वाशिम जिल्हयातील शेतक-यांना २५ टक्के पिक विमा रक्कम नुकसान भरपाई देण्याची मागणी केली, कृषि मंत्री यांना सांगितले की,या वर्षी ऑगष्ट महीण्यामध्ये जिल्हयात कुठेही पाऊस पडला नाही. एकंदरीत पावसामध्ये खंड पडला होता त्याअनुषंगाने मा. जिल्हाधिकारी यांनी पिक विमा योजनेमधील तरतुदीनुसार सोयाबीन पिकाच्या उत्पादनामध्ये ५० टक्के घट येणे अपेक्षीत असल्यामुळे विमा कंपनीने २५ टक्के रक्कम नुकसान भरपाई अग्रीम म्हणुन देण्याबाबत दिनांक ०९.०९.२०२३ रोजी कळविले होते. परंतु विमा कंपनीने ही बाब अमान्य करुन विभागीय आयुक्त तसेच अतिरिक्त सचिव कृषि यांच्याकडे अपील दाखल केले. या दोन्ही अपीलावर सुनावणी होऊन जिल्हाधिकारी वाशिम यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करुन विमा कंपनीने वाशिम जिल्हयातील शेतक-यांना अग्रीम देण्याबाबत आदेश दिले.
वाशिम जिल्हयात ज्या निकषाच्या आधारावर अधिसूचना काढण्यात आली होती त्याच आधारावर शेजारील अकोला, बुलडाणा, बीड जिल्हयात सुध्दात अधिसूचना काढण्यात आली होती. परंतु अकोला, बुलडाणा व बीड जिल्हयात कंपनीने नुकसान भरपाईची रक्कम देण्यास सुरुवात केली असुन वाशिम जिल्हयाबाबत नुकसान भरपाई देण्यास नकार दिला आहे. वाशिम जिल्हा हा आंकाक्षित व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असुन या वर्षी सोयाबीन व इतर पिकांच्या उत्पादनात मोठया प्रमाणात घट आली असल्याने शेतकरी हवालदिल झाला असुन शेतक-यांना तातडीने नुकसान भरपाई मिळणे आवश्यक असल्याचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी कृषी मंत्री यांना सांगितले.