वाशिम : जिल्ह्याच्या कारंजा मानोऱ्यासह अनेक भागात,शुक्रवार दि.२६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ०५:०० पावसाची सततधार सुरू असून दुपार नंतर भरपूर पावसाची शक्यता आहे.राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे राहणार असल्यामुळे तिर्थक्षेत्री प्रवास करणाऱ्यांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी व शक्यतोवर बाहेरगावचा प्रवास टाळावा.श्री.जगदंबा देवीचे प्रत्येक संस्थान आणि श्री.नवदुर्गोत्सव मंडळांनी महाप्रसाद व भंडाऱ्याच्या जेवणावळ्या दुपारपूर्वी दिवसा उरकून घ्याव्यात.व ग्रामस्थांनी जेवणावळ्याचे कार्यक्रम रस्त्यात उघड्यावर न ठेवता जवळच्या सभागृहातच घ्यावे.तसेच अन्नधान्याची व स्वयंपाकाची पावसामुळे नासाडी होणार नाही याची दक्षता घ्यावी.यापुढे पाच दिवस दररोज दुपारनंतर,संध्याकाळी व रात्री संपूर्ण विदर्भासह पूर्ण राज्यात चक्रीवादळासह अतिवृष्टी होणार असून,ढगांच्या गडगडाटासह विजाच्या कडकडाटात मुसळधार पाऊस होण्याचा प्राथमिक अंदाज असून,वादळ वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत होण्याची शक्यता असून, राज्याच्या काही भागात विजा पडण्याची व गारपीट होण्याची व नदी नाल्यांना पूर येण्याची, धरणातून अचानक पाण्याचा विसर्ग सुरु होण्याची शक्यता आहे.त्यामुळे नदी नाल्याच्या काठावरील झोपडी वजा घरात राहणाऱ्या ग्रामस्थांनी सुरक्षित जागेवर आसरा घ्यावा.शेतमजूर, गुराखी, मेंढपाळ,शेतकऱ्यांनी, ग्रामस्थांनी दुपारनंतर शेतात थांबू नये.नदीपात्रात,पुलावर पाणी असल्यास पुलावरून, पांदण रस्त्याने जाऊ नये. आपले मोबाईल व इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स साथने टिव्ही, रेडीओ बंद ठेवावेत.चुकूनही हिरव्या झाडाखाली उभे राहू नये. असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवी संजय कडोळे यांनी या वृत्तपत्राद्वारे केले आहे.