कारंजा (लाड) : कारंजा येथे दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी शेतकरी निवास येथे संत जगनाडे महाराज जन्मोत्सव व गुणगौरव सोहळा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी प्रख्यात कीर्तनकार शिवलीलाताई पाटील या उपस्थित होत्या, कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलाने करण्यात आली. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माझी खासदार तथा महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे अध्यक्ष रामदास तडस हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार बाळासाहेब मांगुळकर,मुख्यमंत्र्याचे विशेष कार्य अधिकारी अमोल पाटणकर,महा.प्रां.तै. महासभेचे जिल्हाध्यक्ष शिवदास सूर्य पाटील,मूर्तीजा पूर येथील तेली समाज अध्यक्ष विनायकराव गुल्हाने, दत्तराज डहाके,राजीव भेंडे, कपिले साहेब,समस्त तेली समाज महिला संघटनेच्या अध्यक्ष प्रमिलाताई जीरापुरे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल भाऊ खोरगडे,नानासा गुल्हाने,वाशिम येथील अस्थिरोग तज्ञ डॉक्टर श्याम काटेकर,नायब तहसीलदार अनिल विठ्ठलराव वाडेकर, सुनीलभाऊ गुल्हाने,राजीव भाऊ गुल्हाने,कारंजा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा गटनेता नितीन गढवाले,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजानन जाधव,संजय क्षीरसागर, हरणे सर हे उपस्थित होते. रामदासजी तडस हे अध्यक्ष भाषण करताना म्हणाले की कारंजा येथील तेली समाजाच्या काही समस्या असतील तर त्यात मी सोडवणार,तेली समाजाच्या भावनासाठी निधी उपलब्ध करून देणार,अमोल पाटणकर बोलताना म्हणाले की समाजाला एकत्रित करणे गरजेचे आहे. समाजाने एकजूट राहिली पाहिजे, समाजातील प्रत्येक व्यक्तीला मी मदत करेल,कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण क्षार यांनी केले.सूत्रसंचालन गजानन झझाट यांनी केले तर आभार सतीश क्षीरसागर यांनी मानले.